Last Updated on 03 Oct 2022 7:23 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाकरिता मतदान 3 नोव्हेंबर रोजी होणार
नवी दिल्ली । निवडणूक आयोगाने महाराष्ट्र,बिहार,हरियाणा,तेलंगणा,उत्तर प्रदेश आणि ओडिशा इथल्या रिक्त विधानसभा मतदारसंघाच्या जागा भरण्यासाठी पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्रात 166-अंधेरी पूर्व मतदारसंघात गुरुवार,3 नोव्हेंबर, 2022 रोजी मतदान होणार असून मतमोजणी रविवारी,6 नोव्हेंबर , 2022 रोजी होईल.
या पोटनिवडणुकीसाठी दि. 1 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध झालेली मतदार यादी वापरण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकीत मतदानासाठी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. मतदारांची ओळख पटावी यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मतदार कार्ड वापरता येईल. तथापि, ज्या मतदारांकडे मतदार कार्ड नसेल त्यास आयोगाने निश्चित केलेल्या 9 ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र मतदानावेळी जवळ बाळगणे आवश्यक आहे.
पोटनिवडणूक कार्यक्रम असा
निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 7 ऑक्टोबर 2022 (शुक्रवार),
नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – 15 ऑक्टोबर 2022 (शनिवार),
नामनिर्देशन पत्रांची छाननी – 15 ऑक्टोबर 2022 (शनिवार),
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2022 (सोमवार),
मतदानाचा दिनांक – 3 नोव्हेंबर 2022 (गुरुवार),
मतमोजणीचा दिनांक – 6 नोव्हेंबर 2022 (रविवार)
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक – 8 नोव्हेंबर 2022 (मंगळवार)
| Sl. No. | Name of State | Assembly Constituency No. & Name |
| Maharashtra | 166-Andheri East | |
| Bihar | 178-Mokama | |
| Bihar | 101-Gopalganj | |
| Haryana | 47-Adampur | |
| Telangana | 93-Munugode | |
| Uttar Pradesh | 139-Gola Gokrannath | |
| Odisha | 46-Dhamnagar(SC) |












































































