Last Updated on 14 Dec 2023 7:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
Maharashtra Food Department Recruitment | महाराष्ट्रातील अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने अन्न पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तरीय लिपिक यासह विविध पदांच्या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.या भरती प्रक्रियेत 345 रिक्त जागांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 13 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार mahafood.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
या पदांवर भरती केली जाईल
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. परंतु, पुरवठा ननरीक्षक पदासाठी “अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान (Food Technology or Food Science” विषयामध्ये पदवी असणाऱ्या उमेदवारांना परिक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल. उमेदवार प्रस्तुत परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरल्यास परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. तसेच उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :
निवड प्रक्रिया :
संगणक आधारित चाचणी आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.
अर्ज शुल्काविषयी :
सामान्य :1000 रुपये
OBC, SC, ST, उर्वरित राखीव प्रवर्ग : 100 रुपये
PH श्रेणी : विनामूल्य
मिळणार एवढा पगार :
तर, उच्चस्तरीय लिपिक पदासाठी : 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपये
असा करा अर्ज :
- महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत गट-क विभागातील भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट mahafood.gov.in/website/marathi/home.aspx ला भेट द्या.
- फॉर्ममध्ये मूलभूत तपशील भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- फी भरून फॉर्म सबमिट करा.
- अर्जाची प्रिंट आऊट घेऊन तुमच्याकडे ठेवा.







































































