Last Updated on 26 Jun 2023 12:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । ‘महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीत छत्रपती शाहू राजांचे मोठे योगदान आहे.मानवी कल्याणासाठी शाहूंनी पथदर्शी काम केले आहे’,असे प्रतिपादन वाळवा तालुक्याचे तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी केले.
इस्लामपूर येथील महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि वाळवा पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्यावतीने शाहूमहाराज जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रा.शामराव पाटील होते.
शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्रदीप उबाळे,गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार,जयवंत जाधव,राजेंद्र शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले.
महा. अं नि स राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.यावेळी गट विकास अधिकारी अजिंक्य कुंभार, विस्तार अधिकारी छायादेवी माळी,केंद्र प्रमुख भगवान साठे,वनक्षेत्रपाल अरविंद कांबळे,उमेश कुरलूपकर,प्रा. एल डी पाटील,डॉ.किशोर गावडे,विनोद शेळके,विजय उरुणकर,प्रा.उत्तम वाघमारे,विनोद मोहिते,डॉ.प्रकाश गायकवाड, डॉ अर्जुन पन्हाळे उपस्थित होते.
सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने विविध शाळांनी समता दिंडीने कार्यक्रम ठिकाणी आले..त्यामध्ये आदर्श बालक मंदिर,कमलाबाई रामनामे कन्या विद्यालय,यशवंत हायस्कूल,गुरुदेव हायस्कूल,इस्लामपूर हायस्कूल,सुधाताई कन्या प्रशाला,विद्यामंदिर हायस्कूल,उर्दू ,कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालय , जि.प.शाळा क्र.१ आदी शाळांनी सक्रीय सहभाग घेतला. ‘छत्रपती शाहू महाराज की जय’, ‘माणसा माणसा जागा हो समतेचा तू धागा हो ‘ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.
सूत्रसंचालन प्रा.डॉ.राम घुले यांनी केले.अजय भालकर, एम डी जाधव,अरबाज पटेल,जितेंद्र भिलवडीकर ,राहुल पाटील यांनी संयोजन केले.प्रा.डॉ. सुदाम माने यांनी आभार मानले.

सर्वांनी घेतली सामाजिक शपथ
“छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि सर्व समाज सुधारकांना अभिवादन करून आम्ही असा निर्धार करतो की, सामाजिक ऐक्य, समता आणि सलोखा टिकवण्याचा व वाढवण्याचा प्रयत्नशील राहून आपल्या देशाची एकता, एकात्मता व अखंडता टिकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, जय हिंद!”











































































