Last Updated on 12 Nov 2024 9:20 PM by Sanjay Patil/Adhorekhit
गडचिरोली । राज्यातील महायुती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांनी आज आलापल्ली येथे केली.
अहेरी विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीच्या उमेदवार भाग्यश्री आत्राम यांच्या प्रचारार्थ आलापल्ली येथे आयोजित जाहीर सभेत खा.सुळे यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले. या सरकारबद्दल जनतेच्या मनात प्रचंड चीड आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा ३ हजार रुपये देण्यात येणार असून, कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करणार असल्याचेही खा.सुळे म्हणाल्या.
याप्रसंगी खा.डॉ.नामदेव किरसान, सुरेश पोरेड्डीवार, ऋतुराज हलगेकर, ॲड.अंजली साळवे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.









































































