Last Updated on 12 Dec 2023 8:14 AM by Sanjay Patil/Adhorekhit
बीड । गेल्या तीन महिन्यापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांची आवश्यक ती तपासणी करण्यात येत आहे.
सोमवारी लातूरमधील माकनी आणि मुरुड तसेच बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभा पार पडल्या.यावेळी त्यांची तब्येत खालावल्याने त्यांनी बसून भाषण केले.आज जरांगे पाटील यांची तब्येत अधिक खालावल्याने थोरात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आले आणि डॉक्टरानी त्यांना आराम आणि उपचाराची गरज असल्याचे प्राथमिक तपासणी करून सांगितले.









































































