Last Updated on 16 Dec 2024 8:20 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नागपूरमध्ये महायुतीच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
नागपूर । राज्यातल्या सरकारनं गतीशील कारभार सुरु केला असून, जनतेला ऊर्जा आणि ऊब मिळेल, असं कामकाज करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. विदर्भातल्या जनतेला जास्त न्याय देण्याचा प्रयत्न या अधिवेशनात केला जाईल,असंही ते म्हणाले.
नागपूरमध्ये महायुतीच्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. विधीमंडळाच्या उद्यापासुन सुरु होणाऱ्या अधिवेशनात २० विधेयकं मांडण्यात येणार असून, पूर्वीच्या अध्यादेशांचं विधेयकात रुपांतर होणारं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मंत्रिमंडळाचं खातेवाटप येत्या दोन दिवसात पूर्ण करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीनं उभ राहणारं सरकार असून, संविधानाचा सर्वोच्च सन्मान आणि आदर करणारं असल्याचंही त्यांनी सांगितलं. बीडमधील सरपंचाच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथक नेमणार असून, कोणाचीही गय केली जाणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं. परभणीत संविधानाचा अपमान करणाऱ्या मनोरुग्णाला अटक करण्यात आली असून, मनोरुग्णांच्या कृत्यावर असंविधानिक पध्दतीनं उद्रेक करणं योग्य नव्हे, असंही त्यांनी सांगितलं. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांना गतीमान आणि चांगलं काम करण्याच्या सूचना दिल्या असून, मंत्र्यांच्या कामाचं मूल्यमापन केलं जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 31 Aug 2026 9:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit नियमावलीचे पालन करणे बंधनकारक सांगली | सांगली जिल्ह्यातील सर्व कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल) अशा तत्सम आस्थापनांना जिल्हाद... Read more
ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट फॉर महाराष्ट्र असा अर्थ असून, विरोधक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. विरोधी पक्षांनी चर्चा करावी, चर्चेला आमची तयारी असून, चर्चेपासुन मागं हटणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र, विरोधकांनी सभागृहात चर्चेपासून पळ काढून माध्यमांसमोर बोलण्याच्या तंत्राचा अवलंब करु नये,सदनात त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ असंही ते म्हणाले. विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय कायद्यानं आणि नियमानं अध्यक्षांनी घ्यायचा असतो, अध्यक्षांनी उचित निर्णय घ्यावा, आम्ही त्याचा सन्मान करु, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विरोधी पक्ष सदस्यांची संख्या कमी असली तरी, त्यांचा आवाज ऐकला जाईल, विरोधकांना घेऊन सदनाचं कामकाज करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं. सगळयांनाच संधी देता येत नाही, त्यामुळे प्रत्येकाला अडीच वर्ष देण्याचा निर्णय आपल्या पक्षानं घेतल्याची माहिती उपमुख्मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
Courtesy: Prasar Bharati













































































