Last Updated on 27 Sep 2023 8:30 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्याचा गाडा जिथून हाकला जातो त्या मंत्रालयात पुन्हा एकदा सुरक्षा जाळीवर उडी मारण्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे गृह विभागाकडून नवी मार्गदर्शक नियामवली जारी करण्यात आली आहे.या पुढे मंत्रालयात जाणाऱ्या व्यक्तीची कडक तपासणी केली जाणार आहे.तसेच जाळीवर उडी मारू नये म्हणून आधुनिक यंत्रणा बसवली जाणार आहे एवढंच नाहीतर ड्रोनने सुद्धा नजर ठेवली जाणार आहे.
मागील महिन्यातही अमरावती येथील अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयामधील सुरक्षा जाळीवर उडी मारून आंदोलन केले होते.त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं होते.आता बीडच्या आंबाजोगाई येथून आलेल्या तरुणाने शिक्षक भरती करावी या मागणीसाठी सुरक्षा जाळीवर उडी मारत आंदोलन केले.यानंतर गृहविभाग अॅक्शन मोड आला असून मंत्रालयात येणाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
मंत्रालयात येणाऱ्यांसाठी काय आहेत सूचना
- भेटीसाठी आलेल्या व्यक्तींना घरून जेवणाचे डबे आणता येणार,पण बाहेरील खाद्यपदार्थ आणता येणार नाही.
- खासगी गाड्यांसाठी परवानगी घ्यावी लागणार आहे.
- प्रत्येक व्हिजिटरसाठी पास घेणे आवश्यक
- ज्या मजल्यावर जायचे आहे त्याच मजल्याचा पास मिळणार आहे,त्याशिवाय इतरत्र कुठेही फिरता येणार नाही.
- प्रत्येक मजल्यासाठी वेगळ्या कलर कोडचा पास देण्यात येणार आहे
- संध्याकाळी 6.15 वाजेपर्यंत मंत्रालयातील कामकाज सुरु असते.त्यामुळे त्यानंतर मंत्रालयात रेंगाळता येणार नाही.
- लोकप्रतिनिधी, मंत्री,अधिकारी यांना वेगवेगळ्या प्रवेशद्वारातून प्रवेश मिळणार.
- सर्व प्रकारच्या कंत्राटी कामगारांची सीसीटीएनएस यंत्रणेद्वारे तपासणी
- कार्यालयीन वेळेनंतर भेटीसाठी आलेल्या व्यक्तींना थांबता येणार नाही.
- मंत्रालय परिसरात पाळीव प्राण्यांना प्रतिबंध असणार आहे.
- मंत्रालय सुरक्षेसाठी कार्यान्वित असलेली Drone यंत्रणा सुस्थितीत ठेण्याबाबत सूचना
- वारंवार मंत्रालयात प्रवेश करण्याची कारणमिमांसा यादी तयार करण्याच्या सूचना
- मंत्रालयामध्ये प्रवेश करणाऱ्यांना फक्त दहा हजार पेक्षा अधिक रक्कम मंत्रालयात आणता येणार नाही.
- लोकप्रतिनिधींसोबत येणाऱ्या लोकांनाही पासशिवाय प्रवेश देण्यात येणार नाही.
- मंत्रालय मुख्य इमारत व विस्तार इमारतीच्या टेरेसवर जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात येत आहेत.
मंत्रालयातील प्रवेशासाठीचे सर्व नियम व अटी तुम्ही ‘या’ ठिकाणी पाहू शकता.









































































