Last Updated on 08 Oct 2024 6:29 PM by Sanjay Patil/Adhorekhit
Nobel Prize In Physics : भौतिकशास्त्र विषयासाठी देण्यात येणारा नोबेल पुरस्कार यंदा जॉन एच हॉपफिल्ड आणि जोफ्रे इ. हिंटन यांना जाहीर झाला आहे.
या दोन्ही शास्त्रज्ञांनी कृत्रिम न्यूरल नेटवर्कच्या सहाय्याने मशीन लर्निंग करण्यासाठी भौतिकशास्त्राचा वापर करून संशोधन केलं. विविध प्रकारच्या प्रतिमाची पुनर्बांधणी करणं आणि त्यांची साठवणूक करण्यासाठी सक्षम असलेली मेमरी जॉन हॉपफिल्ड यांनी तयार केली आहे.
जोफ्रे हिंटन यांनी प्रतिमेतले विशिष्ट घटक ओळखण्यासाठी आणि डेटाची वैशिष्ट्ये स्वायत्तपणे शोधण्यासाठीची पद्धत शोधून काढली.







































































