Last Updated on 13 Dec 2024 9:55 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली। भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश विश्वविजेता ठरला आहे. दोम्माराजू गुकेश ने १८व्या वर्षी विश्वविजेता होण्याचा बहुमान पटकावला. १८वर्षीय गुकेशने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेता डिंग लिरेनचं आव्हान मोडून काढत इतिहास घडवला.
आतापर्यंतच्या १३ डावांपैकी ३२वर्षीय लिरेनने पहिला डाव जिंकला होता. त्यानंतर गुकेशने तिसरा डाव जिंकून बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही ग्रँडमास्टर्सनी सलग सात डाव बरोबरीत सोडवले होते. ११व्या डावात गुकेशने विजय मिळवून बरोबरीची कोंडी सोडवली. १२व्या डावात लिरेनने बाजी मारली, अखेरचा डाव कोण जिंकणार की हा मुकाबला टायब्रेकरमध्ये जाणार याकडे बुद्धिबळ चाहत्यांचं लक्ष होतं. गुकेशने दमदार खेळ करत विश्वविजेता होण्याचा मान पटकावला. सगळ्यात लहान वयाचा विश्वविजेता होण्याचा विक्रम आता गुकेशच्या नावावर नोंदला गेला आहे. लिरेनच्या हातून झालेल्या घोडचुकीनंतर मुकेश विश्वविजेता होणार असल्याचं स्पष्ट झालं आणि त्याच्या डोळ्यात विजयाश्रु तरळले.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 03 Jun 2026 8:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit सांगली । कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठा पुरवणे अत्यावश्यक असल्याने सातारा व सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील कोयना धरण... Read more
गुरुवार, १२ डिसेंबर रोजी सिंगापूर येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ चम्पियनशिप सामन्याच्या १४व्या निर्णायक सामन्यात हिंग लिरेनचा पराभव करून सर्वात गुकेश विश्वविजेता ठरला, मुकेश हा विश्वनाथन आनंदनंतर विश्वविजेता ठरणार दुसरा भारतीय ठरला.
गुकेश आणि डिंग यांनी गुरुवारी सामन्याच्या अंतिम डावात प्रत्येकी ६.५ गुणांसह बरोबरी साधली. १४व्या डावात, ज्यात डिंग पांढन्या सोंगट्बासह खेळत होता, तो सामन्याच्या ५३व्या चालीत डिंगने चूक होईपर्यंत अनिर्णित दिशेने वाटचाल केली होती. मुकेशने खेळत राहत डिंगवर दबाव आणणं सुरू ठेवले आणि यात गतवर्षीचा विश्वविजेता लिरेन फसला.
लिरेन आणि गुकेश यांच्यातील अंतिम डावातील सामना ही ड्रॉ होण्याच्या मार्गावर होता पण डिमच्या हातून मोठी घोडचूक घडली आणि त्याच्या हातातून सामना निसटला.













































































