Last Updated on 03 Nov 2022 11:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी वाघ यांच्या नियुक्तीची घोषणा केली. उमा खापरे विधान परिषदेवर निवडून आल्याने महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी वाघ यांना संधी देण्यात आली आहे.

चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा महिला मोर्चा संघटनात्मकदृष्ट्या अधिक बळकट होईल तसेच विविध पक्षांमधील महिला कार्यकर्त्या भाजपशी जोडल्या जातील, अशी अपेक्षा बावनकुळे यांनी केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिलांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. ते निर्णय राज्यातील महिलापर्यंत पोहचविण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करण्यावर आपण भर देऊ, असे वाघ यांनी यावेळी सांगितले.













































































