Last Updated on 03 Oct 2023 1:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवार दि. ६ ऑक्टोबर २०२३ रोजी हातकणंगले लोकसभा मतदार संघातील इस्लामपुर,शिराळा,शाहुवाडी विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी यांच्याशी संवाद साधणार असुन जनसंपर्कासाठी,जनकल्याणासाठी घर चलो अभियान अंतर्गत इस्लामपुर शहरातील मुख्य बाजारपेठेतील कुटुंब व व्यापारी यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती भाजपाचे वाळवा तालुक अध्यक्ष निवास पाटील व भाजपाचे इस्लामपुर शहर अध्यक्ष अशोकराव खोत यांनी दिली.
गेल्या ९ वर्षामध्ये भाजपाच्या व केंद्र सरकारच्या माध्यमातुन विविध प्रभावशाली योजना राबविण्यात आल्या. देशाचा अर्थिक स्तर उंचविण्यासाठी प्रत्येक कुटुंबापर्यंत योजना पोहचविल्या गेल्या. योजनांचा थेट लाभ अत्यंत पारदर्शीपणी लाभार्थ्याला दिला गेला.देशातील अंतर्गत दळणवळण व्यवस्था अत्यंत दर्जेदार करण्यात आली. यामुळे उद्योग व व्यवसायाला चालना मिळाली व देशाचा अर्थिक स्तरही वाढला गेला. ही ९ वर्षातील मोदी सरकारने केलेली कामे लोकांच्यापर्यंत पोहचावीत त्यांच्याशी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा संवाद व्हावा. जनतेच्या अपेक्षा समजुन घ्याव्यात. यासाठी घर चलो अभियानाच्या माध्यमातुन राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे येवुन थेट लोकांशी संपर्क साधत आहेत.
सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील(दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले असुन, शुक्रवारी सकाळी १० वाजता इस्लामपुर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा याठिकाणी त्यांचे आगमन होणार आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास अभिवादन करतील.यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते यल्लामा चौक ते गांधी चौक या मार्गावरील कुटुंबांना व व्यापारी वर्गाशी संवाद साधणार आहेत. गांधी चौक येथे घर चलो अभियानाची सांगता होवुन उपस्थितांना प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार आहेत. घर चलो अभियानमध्ये इस्लामपुर,शिराळा व शाहुवाडी मतदार संघातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येन उपस्थित राहणार आहेत.
घर चलो अभियानामध्ये महराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री सुरेश खाडे,खासदार संजय पाटील,आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपिचंद पडळकर,भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी मुरलीधर मोहोळ,भाजपाचे प्रदेशचे संघटन सरचिटणीस विक्रांत पाटील,संघटन मंत्री मकरंद देशपांडे,भाजपाचे सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील,माजी अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख,हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे प्रभारी सत्यजीत देशमुख,शिराळा विधानसभा निवडणुक प्रमुख सम्राट महाडिक,शाहुवाडी विधानसभा निवडणुक प्रमूख प्रविण उर्फ राजु प्रभावळकर आदी सह अन्य मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती शेवटी निवास पाटील व अशोकराव खोत यांनी दिली.
यावेळी भाजपा प्रदेशचे विशेष निमंत्रीत सदस्य प्रसाद पाटील,वाळवा तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष धैर्यशील मोरे,वाळवा तालुका भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष मधुकर हुबाले,वाळवा तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,सांगली जिल्हा भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रविण माने,माजी नगरसेवक एल.एन.शहा,सुभाष शिंगण,भास्कर कदम,भाजपाचे वाळवा तालुका संघटन सरचिटणीस संदीप सावंत,सरचिटणीस दादासाहेब रसाळ,यदुराज थोरात,रणजीत माने,विश्वजीत पाटील,भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सतेज पाटील,संघटन सरचिटणीस प्रविण परिट,भास्कर मोरे,गजानन फल्ले,अजित पाटील,अक्षय पाटील,संदीपराज पवार आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.









































































