Last Updated on 26 Oct 2024 6:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । भाजपकडून दुसरी यादी जाहीर झाली आहे. एकूण २२ जणांची नावं जाहीर करण्यात आली आहे. आधी ९९ जणांची यादी जाहीर केली आहे. आता एकूण १२१ उमेदवार जाहीर झाले आहे. या दुसऱ्या यादीत गोपीचंद पडळकरांना उमेदवारी दिली आहे.
भाजपच्या दुसऱ्या यादीतही देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेत्यांनाच संधी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. देवयानी फरांदे यांना नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत कसबा पेठचा देखील समावेश आहे. येथून पुन्हा एकदा हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धुळे ग्रामीणमधून भाजपनं राम भदाणे यांना उमेदवारी दिली आहे. तर मलकापूरमधून चैनसूख संचेती यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. अकोटमधून प्रकाश भारसाखळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राज्यात २० नोव्हेंबरला मतदान
राज्यातील २८८ जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. २०१९ मध्ये भाजपला १०५, शिवसेनेला ५६ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. तर, २०१४ मध्ये भाजपला १२२, शिवसेनेला ६३ आणि काँग्रेसला ४२ जागा मिळाल्या होत्या.
भाजपची दुसरी यादी
धुळे ग्रामीण – राम भदाणे
मलकापूर – चैनसुख मदनलाल संचेती
अकोट – प्रकाश भारसाकले
अकोला पश्चिम – विजय अग्रवाल
वाशिम (अजा) – श्याम रामचरणजी खोडे
मेळघाट – केवलराव काळे
गडचिरोली – मिलिंद नरोटे
राजुरा – देवराव भोंगले
ब्रहमपुरी – कृष्णलाल बाजीराव सहारे
वरोरा – करण देवतले
नाशिक मध्य – देवयानी फरांदे
विक्रमगढ – हरिश्चंद्र भोये
उल्हासनगर – कुमार उत्तमचंद आयलानी
पेन – रवींद्र दगडू पाटील
खडकवासला – भिमराव तापकीर
पुणे (छावणी)- सुनील कांबळे
कसबा पेठ – हेमंत रासणे
लातूर ग्रामीण – रमेश कराड
सोलापूर शहर मध्य – देवेंद्र कोठे
पंढरपूर – समाधान आवताडे
शिराळा – सत्यजित शिवाजीराव देशमुख
जत – गोपीचंद पडळकर












































































