Last Updated on 22 Dec 2022 9:26 PM by Sanjay Patil/Adhorekhit
दीडशेपेक्षा जास्त मुला-मुलींचा उत्साही सहभाग
पुणे । ‘बालगोकुलम पुणे’ पश्चिम विभागाचे (कसबा, संभाजी, विद्यापीठ, सिंहगड, कात्रज) हिवाळी शिबिर 18 डिसेंबर 2022 रोजी अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले.नवीन मराठी शाळा येथे झालेल्या या शिबिरात संभाजी,सिंहगड, कात्रज आणि विद्यापीठ भागातील एकूण १५४ मुले-मुली आणि २५ शिक्षकांनी भाग घेतला.

शिबिरात नावनोंदणी करून मुलांनी गरम गरम नाश्ता केला व सुरुवातीला विविध क्रीडा स्पर्धे मध्ये भाग घेतला.शिशु गटासाठी (२ री व ३ री) लंगडी स्पर्धा,बाल गटासाठी (४ थी, ५ वी, ६ वी) डॉजबॉल स्पर्धा,आणि किशोर गटांसाठी रिंग-ओ–स्टिकच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
त्यानंतर बौद्धिक सत्रात शिशु गटाने शब्द देऊन गोष्ट तयार करणे,आवाजाने गट बनवणे,विविध भारतीय सणाची चित्रे रंगवणे अशा वेगवेगळी कल्पकता असलेलया खेळांत भाग घेतला.बाल गटाने वेगवेगळ्या विषयांवर गटाने कल्पक जाहिराती तयार करून त्याच खूप सुंदर असं सादरीकरण केलं.
किशोर गटाने ‘सामाजिक जबाबदारी म्हणजे काय’ या विषयावर ज्ञानप्रबोधिनीच्या संवादिनी गटाच्या आशाताई रामदासी यांनी घेतलेल्या या संवाद -कृती सत्रात उत्स्फूर्तपणे भाग घेतला.

खुप खेळुन झाल्याने मुलांनी दुपारी गरम गरम पुरी भाजी व आम्रखंडाचा सर्वांसोबत एकत्रित भोजनाचा आस्वाद घेतला.त्यानंतर विविध भागातील बालगोकुलम ने गीत स्पर्धेत खूपच सुंदर सादरीकरण असलेले आवेशपूर्ण देशभक्तिपर आणि प्रेरणादायी समूह सादर केली.
बौद्धिक सत्रात शिशु आणि बाल गटाला संस्कृत भारतीच्या कार्यकर्त्यांनी काही छान छान संस्कृत गाणी शिकवली. उत्तम चाल आणि हावभाव करत त्या गाण्यांचा आनंद घेत मुलांनी ती गाणी आत्मसात केली.यानंतर श्री प्रकाश जोशी यांनी मुलांसोबत हसत खेळत संस्कार भारतीच्या पारंपरिक रांगोळीतील चिन्हे रेखाटायला शिकवली. ती चिन्हे वापरून मुलांनी रांगोळ्या काढलया तसेच बाल गटाने शिबिरातील अनुभवांवर छान छान डूडल्सही काढण्याचाही आनंद घेतला दीपाली ताई शेंडे नी किशोर गटासोबत व्यक्तिमत्व विकासा अंतर्गत SWOT विश्लेषण हे सत्र घेतले.

ह्या पुढील सत्र म्हणजे शिबिरातील सर्व मुलांना सैनिक प्रशिक्षणाची झलक मिळावी म्हणून दोरावर चढणे, अडथळे पार करणे, दोरावरून लटकत जाणे, पोटावर रांगत छोट्या जागेतून पार जाणे अशा प्रकारच्या ८ वेगवेगळ्या कृती करण्याची कामगिरी देण्यात आली.वेगवेगळे गट करून सर्वांनी अत्यंत उत्साहाने या गटकार्यात भाग घेतला. या संपूर्ण प्रशिक्षणात मुलांनी खूप धम्माल केली सर्वांनां ह्या कृती करताना खूप मज्जा येत होती त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता आपल्या गटातील प्रत्येक सहकाऱ्याला सोबत घेऊन एक कृती पूर्ण करून दुसरी कृती पूर्ण करत करत अश्या संपूर्ण कृती पूर्ण केल्या.
दुपारी ३.३० वाजता पालकांसाठी आयोजित “मुले आणि पालक यांच्यातील संवाद” या आजच्या धावपळीच्या जीवनात अत्यंत आवश्यक असलेल्या विषयावर संवादिनी गटाच्या दीपालीताई शेंडे आणि विशाखा ताई वेलणकर यांनी पालकांसोबत संवाद साधला

शेवटी समारोपाच्या कार्यक्रमात मुले,पालक, शिक्षक यांना दिवसभराच्या कार्यक्रमांचा सारांश सादर करण्यात आला आणि विविध स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले. बालगोकुलम पुणे महानगर मंडळाच्या सदस्या दीपाताई कुलकर्णी यांनी पालक आणि मुलांशी संवाद साधला आणि जास्तीत जास्त पालकांनी ‘बालगोकुलम’ च्या उपक्रमांमध्ये नियमित सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
बरेच से पालक आपली आई वडिलांशिवाय कधीच न राहणारी मुलं पूर्ण दिवस भर खेळून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आश्चर्यचकित झाली होती. व जाताना मुलासाठी सामाजिक जबाबदारी च भान, शारीरिक, बौद्धिक विकास व नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी अश्या शिबिराची किती आवश्यकता आहे व त्या सर्वांनी हे शिबीर आयोजित करून मुलांना हि संधी उपलब्ध करून दिल्या बद्दल बालगोकुलम च्या सर्व शिक्षकांचे आभार मानले.









































































