Last Updated on 29 May 2023 7:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अधोरेखित ऑनलाइन डेस्क । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12 वी पुरवणी परीक्षेचे आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने येत्या 29 मे पासून सुरु करण्यात येणार आहेत.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी) परीक्षा फेब्रु-मार्च निकाल जाहीर झालेला असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने पुरवणी परीक्षा जुलै मध्ये घेण्यात येणार आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेस पुनर्परीक्षार्थी,यापूर्वी प्रमाणपत्र खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ठ होणाऱ्या ITI औद्योगिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत.सदर परीक्षेस इच्छिणाऱ्या विद्याथ्र्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने इयत्ता 12 वी साठी www.mahahsscboard.in संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा खालीलप्रमाणे :







































































