Last Updated on 25 May 2023 3:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. आज दुपारी 2 वाजता विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे.कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 96.01 टक्के लागला आहे.
यंदा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली.3 हजार 195 मुख्य केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी 14 लाख 28 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी यंदा झाली होती.
राज्य मंडळाने जाहीर केलेल्या निकाला निकालानुसार यंदा बारावीचा 91.25 टक्के लागला. गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा निकालात 2.97 टक्के घट झाली आहे.कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 96.01 टक्के, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी 88.13 टक्के लागला. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 4.59 टक्क्यांनी अधिक आहे.यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. 93.73 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 89.14 टक्के आहे.
दृष्टीक्षेपात निकाल असा
मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 93.73
मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 89.14
पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या (रिपीटर) निकालाची टक्केवारी 44.33 टक्के
खाजगी विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 82.39 टक्के
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 93.43 टक्के
विभागनिहाय निकाल असा
कोकण : 96.01
पुणे : 93.34
कोल्हापूर : 93.28
अमरावती : 92.75
औरंगाबाद : 91.85
नाशिक : 91.66
लातूर : 90.37
नागपूर : 90.35
मुंबई : 88.13
शाखानिहाय निकालाची टक्केवारी
विज्ञान : 96.09 टक्के
कला : 84.05 टक्के
वाणिज्य : 90.42 टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम : 89.25 टक्के
गेल्या पाच वर्षांचा निकाल
2018 – 88.41 टक्के
2019 – 85.88 टक्के
2020– 90.66 टक्के
2021 – 99.63 टक्के
2022 – 94.22 टक्के
दुपारी 2 वाजता निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर,औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल आज दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी ‘हे’ करा
दरम्यान,निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आक्षेप असेल किंवा गुणपडताळणीसाठी अर्ज करायचे असेल तर त्यासाठी 26 मे ते 5 जून पर्यंत मुदत असेल. या परीक्षेतील उत्तर पत्रिकांचा झेरॉक्स कॉपी ज्या विद्यार्थ्यांना हव्या असतील त्यांना 26 मे ते 14 जून या कालावधीत महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी देखील ऑनलाईन शुल्क जमा करावे लागतील.
बारावीचा निकाल कुठे,कसा पहायचा? जाणून घ्या…
या संकेतस्थळावर पाहू शकतात निकाल
विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहण्यासाठी विविध वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. परीक्षांचे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळाला भेट देणं अपेक्षित असेल. त्यासोबतच http://mahresult.nic.in, http://hscresult.mkcl.org या लिंकवर जाऊनही निकाल पाहू शकतात.
असा चेक करा निकाल
mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
होमपेजवर, बारावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
तुमची आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा.(तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.)
“निकाल पहा” बटणावर क्लिक करा.
महाराष्ट्र राज्य बोर्ड 12 वीचा निकाल 2023 स्क्रीनवर दिसेल.
यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.
भविष्यातील वापरासाठी Save करा.









































































