Last Updated on 11 Jul 2022 9:26 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली |
बहे सर्व सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी जयदीप बाळासाहेब पाटील यांची तर भीमराव शंकर कुंभार यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
बहे,हुबालवाडी खरातवाडी अशा तीन गावांचे कार्यक्षेत्र व सुमारे 1400 मतदार असलेल्या बहे सोसायटीची निवडणूक अत्यंत चुरशीने लढली गेली.दोन्ही पॅनलप्रमुखांनी विजयाचा दावा केला होता.माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक,राजारामबापू कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील व सहकाऱ्यांनी विरोधकांना धक्का दिला.सत्तारूढ पॅनेलला 8 तर विरोधी पॅनेलला 5 जागा मिळाल्या होत्या.
अध्यक्षपदासाठी सत्ताधारी गटाकडून जयदीप पाटील यांनी तर विरोधी गटाकडून लालासो भगवान मोहिते यांनी अर्ज दाखल केले.उपाध्यक्ष पदासाठी सत्ताधारी गटाकडून भीमराव कुंभार यांनी तर विरोधी गटाकडून गणपत जगन्नाथ शिंदे यांनी अर्ज दाखल केले.सत्ताधारी गटाला 8 मते तर विरोधी गटाला 4 मते मिळाली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. जे. साळवी यांनी काम पाहिले.निवडणूक सहाय्यक म्हणून संस्थेचे सचिव सुधाकर मोहिते यांनी काम पाहिले.

राजारामबापू कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील,कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव पाटील,माजी सभापती विलासराव पाटील,हणमंतराव पाटील,राजारामबापू बँकेचे संचालक बाबुराव हुबाले,सिताराम हुबाले,कृष्णेचे संचालक अविनाश खरात,सर्जेराव दमामे,मानसिंग पाटील,सुधीर रोकडे,संजय हुबाले,भानुदास खरात,खरातवाडीचे सरपंच पृथ्वीराज खरात,हौशेराव शेवाळे,शिवाजी पाटील,मानसिंग पाटील,सयाजी पाटील,अशोक देशमुख,दिनकर पाटील,प्रसाद यादव,रामचंद्र पाटील,यशवंत भीमराव पाटील,डांगबाबा शिंदे,विकास नांगरे,कुंडलिक खरात,मालोजी शिंदे,नितीन थोरात,गणेश शेवाळे,अविनाश पाटील,सुरज पाटील,रोहित तोरस्कर,हणमंत नावडकर,रणजित पवार आदी उपस्थित होते.










































































