Last Updated on 03 Jan 2024 3:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । बहे (ता. वाळवा) येथील रामलिंग बेटावरील राम मंदीरात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य प्रसाद पाटील व भाजपाचे वाळवा तालुका सरचिटणीस यदुराज थोरात यांच्या हस्ते अयोध्येतील प्रभू रामचंद्र मंदीरातील अक्षता कलशाचे मोठया उत्साहात स्वागत करून विधिवत पूजन करण्यात आले.याप्रसंगी यावेळी पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्रीराम,जय राम,जय जय रामाच्या उद्घोषात राम मंदीरातील वातावरण अगदी भक्तिमय होऊन गेले.
उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदीर उभा करण्यात आले असून या मंदीरात दि.२२ जानेवारी २०२४ रोजी मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहेत. यानिमित्त संपूर्ण देशात गावोगावी अक्षता कलशाचे पूजन करण्यात येत आहे.या अक्षता कलशाचे बहे येथील रामलिंग बेटावरील राम मंदीरामध्ये भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य प्रसाद पाटील व भाजपाचे वाळवा तालुका सरचिटणीस यदुराज थोरात यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.उदय बडवे यांनी या सोहळ्याचे पौरोहित्य केले.यावेळी आरत्या घेण्यात आल्या.
यावेळी माजी सरपंच बी.जी.पाटील,बहे सोसायटीचे सभापती वाय.बी. पाटील,नानासो महाडिक पतसंस्थेचे शाखाधिकारी मानसिंग पाटील,भगवान यादव,संजय पाटील,संजय मुळीक,धनंजय थोरात,नारायण कुंभार,तात्यासो शेवाळे,अनंत बडवे आदी प्रमुख तसेच भाविक उपस्थित होते.












































































