Last Updated on 12 Feb 2022 6:57 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
बहे (ता.वाळवा) येथे टायगर ग्रुपच्या शाखेचे नुकतेच उदघाटन करण्यात आले.टायगर ग्रुपचे राज्य कार्याध्यक्ष अभिजित पवार यांच्या हस्ते उदघाटन संपन्न झाले..
यावेळी जिल्हाध्यक्ष पिंटू माने,वाळवा तालुका उपाध्यक्ष शरद निकम, सांगली संपर्कप्रमुख गणेश माळी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
बहेचे अध्यक्ष कालिदास पाटील यांनी प्रमुख उपस्थितांचे शाल,श्रीफळ,फेटा व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन दिनकर पाटील यांनी केले.यावेळी उपाध्यक्ष दीपक मोहिते,कार्याध्यक्ष प्रवीण फल्ले,अश्विनकुमार पाटील,धनंजय थोरात,विनायक लोहार,वैभव साळुंखे,विकास पाटील,प्रवीण पाटील,शंकर पाटील,महेश शिंदे,केशव देशमुख,अजिंक्य दमामे,स्वप्नील पाचुंब्रे,अरुण सावंत,शिवलिंग नांगरे,प्रमोद थोरात आदी उपस्थित होते.







































































