Last Updated on 29 Sep 2022 7:45 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । वाळवा तालुक्यातील बहे येथे उद्या, दि.३० सप्टेंबर रोजी फेरफार अदालत होणार असल्याची माहिती तलाठी अविनाश पाटील यांनी दिली.
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत या फेरफार अदालतीचे आयोजन बहे ग्रामपंचायत सभागृहात शुक्रवारी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे.प्रांताधिकारी संपत खिलारी,तहसीलदार प्रदीप उबाळे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.यावेळी वारस उतारे यासह अन्य दाखल्यांचे वाटप होणार आहे.या अदालतीमध्ये ई पीक पहाणी,ई चावडी,लम्पी लस,महिला सक्षमीकरण तपासणी,संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ योजना,फेरफार नोंदी निर्गत,उत्पन्नाचे अहवाल वाटप,मतदार आधार लिंक करणे अशा अनेक विविध प्रकारच्या योजनेबाबत मार्दर्शन केले जाणार आहे.तरी शेतकरी बंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तलाठी अविनाश पाटील यांनी केले आहे.












































































