Last Updated on 13 Sep 2024 9:15 AM by Sanjay Patil/Adhorekhit
रामलिंग बेट व कृष्णा घाट परिसरात विसर्जनासाठी गर्दी
सांगली । ‘गणपतीबाप्पा मोरयाऽऽ पुढच्या वर्षी लवकर याऽऽ’ असा गजर करत बहे परिसरात गणेश भक्तांनी आज (गुरुवारी) सहाव्या दिवशी घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन केले.उत्साही वातावरणात विसर्जन करण्यात आले. विसर्जनासाठी कृष्णा नदीकाठी येथील रामलिंग बेट परिसर व कृष्णामाई घाट परिसरात गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
चिमुकल्यांसह अबाल वृध्द,युवक, महिलांनी गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी गर्दी केली होती.संपूर्ण परिसर गणेशमय झाला होता. सहा दिवसांच्या पाहुणचारानंतर भाविक भक्तांनी गौरींच्या विसर्जनाबरोबरच आपल्या लाडक्या बाप्पांचा गुरुवारी निरोप घेतला. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली होती.

लहान मुलांसह अबालवृध्द गणपती बाप्पांना निरोप देताना ‘गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या’,’गणपती गेले गावाला,चैन पडेना आम्हाला’ अशा घोषणांचा जय जयकार करत होते.त्यामुळे सारा परिसर घोषणांनी दणाणून गेला होता.बहे पूल व कृष्णामाई घाट येथे भक्तगण गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत विसर्जनासाठी गणेश मूर्ती घेवून जाताना दिसत होते.रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते.











































































