Last Updated on 30 Nov 2023 11:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । बहे येथे तीन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळेस दोन गवा रेड्यांचेही दर्शन झाले.गवारेडा मुख्य रस्त्यावरून शेतात जात असतानाचा व्हिडिओ युवकांनी काढला.मोबाइलमध्ये कैद हा गवा रेड्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक गवारेडा महाकाय असल्याचे दिसते.
तीन दिवसांपूर्वी रात्री बाराच्या सुमारास येथील युवकांना गावच्या हद्दीतच बहे-कृष्णा कारखाना रस्त्यावरून निघालेले गवारेडे दिसले.येथील काही युवक हे तांबवे येथून देवदर्शन करून परत येत असताना त्यांना हे गवे मुख्य रस्त्यावरून जाताना दिसले.या युवकांना पाहताच एक गवारेडा त्यांच्या दिशेने येऊ लागला.पण गाड्यांच्या प्रखर लाइटमुळे हे दोन्ही गवे उसाच्या शेतात निघून गेले.
बहे परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन
गवारेडा मुख्य रस्त्यावरून शेतात जात असतानाचा व्हिडिओ युवकांनी काढला.मोबाइलमध्ये कैद हा गवा रेड्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.या व्हिडिओत गवारेडा महाकाय असल्याचे दिसते.

कृष्णाकाठावरील बहे,हुबालवाडी,खरातवाडी,फार्णेवाडी आदी कृष्णा नदीकाठच्या शेत-शिवारात गेल्या सात-आठ महिन्यात वरचेवर बिबट्याचे दर्शन होत आहे.त्यातच आता युवकांना गव्यांचे झालेले दर्शन यामुळे बिबट्यानंतर आता गवा रेड्यांचाही वावर दिसून येत आहे.










































































