Last Updated on 27 Jun 2024 12:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । शिरशी ते पुसेसावळी महामार्गाअंतर्गत बहे (ता. वाळवा) येथे गावातून जाणारा रस्ता २७ फूट रुंदीने करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्या अंतर्गत असणारी अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत.
शिरशी ते पुसेसावळी महामार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे.त्याअंतर्गत बहे एसटी स्टँड रोड ते बहे हायस्कूल परिसर रस्ता रुंदीकरण व्हावे,रस्त्याच्या कडेला गटार बांधकाम व्हावे अशी मागणी बहे येथील सर्व पक्षीय तसेच शेतकरी संघटनांची आहे.सदरचे काम सुरु झाल्यानंतर हे काम थांबवण्यात आले होते.आज भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य व उद्योजक प्रसाद पाटील,सरपंच संतोष दमामे,उपसरपंच अधिक मोहिते,जयदीप थोरात,प्रमोद सुतार तसेच संघटनेचे पदाधिकारी गणेश शेवाळे,शहाजी पाटील,प्रवीण पाटील,विलास पाटील तसेच सयाजी पाटील माजी उपसरपंच धनाजी पाटील,रोहित तोरस्कर,अविनाश पाटील आदी आणि बांधकाम विभागाचे उप अभियंता स्वप्निल पाटील,शाखा अभियंता जी.आर. टेपाळे,संबंधित ठेकेदार व पोलीस प्रशासन यांच्यात चर्चा झाली.
संबंधीत अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसह या रस्त्याची पाहणी केली.त्यानंतर गावातून जाणारा रस्ता २७ फूट रुंदीने करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्या अंतर्गत असणारी अतिक्रमणे काढण्याचे ठरले.









































































