Last Updated on 13 May 2024 9:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । बहे (ता. वाळवा) येथे भैरवनाथ देवाची यात्रा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरी
करण्यात आली.पालखी मंदिरातून बाहेर येताच भाविकांनी भैरोबाच्या नावानं चांगभलंचा गजर करत गुलाल-खोबऱ्याची उधळण केली.यावेळी भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात्रेनिमित्त भैरवनाथ मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.पहाटे विधीवत पुजा झाल्यानंतर आरती झाली.दिवसभर मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती.अक्षयतृतीयेला सायंकाळी चार वाजता पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला.पालखी मंदिरातून बाहेर येताच भाविकांनी भैरोबाच्या नावानं चांगभलंचा गजर करत गुलाल-खोबऱ्याची उधळण केली.यावेळी भाविकांनी मंदिर परिसरात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी केली.नंतर गावातील प्रमुख मार्गावरून पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी ध्वनी यंत्रणेला फाटा देत यात्रा पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली.यावेळी सरपंच संतोष दमामे,उपसरपंच अधिक मोहिते तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य,यात्रा कमिटी सदस्य,बारा बलुतेदार व युवावर्ग, ग्रामस्थ मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.















































































