Last Updated on 15 Jun 2020 11:34 AM by
इस्लामपूर : बहे (ता.वाळवा) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रा.डॉ.सौ.सुवर्णा शशिकांत पाटील यांची आज (सोमवारी) बिनविरोध निवड झाली.उपसरपंच मनोज माणिकराव पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर ही निवड करण्यात आली.
सरपंच सौ.छायाताई विठ्ठलराव पाटील अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.ग्रामसेवक ए. बी.खोत यांनी अर्जाचे वाचन केले.नूतन उपसरपंच प्रा.डॉ.सौ.सुवर्णा पाटील या उच्च विध्याविभूषित असून त्या बोरगाव येथील मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात अधिव्याख्यात्या आहेत.उधोजक प्रा.शशिकांत पाटील यांच्या त्या पत्नी आहेत.या निवडीनिमित्त त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

नूतन उपसरपंच प्रा.डॉ.सौ.पाटील म्हणाल्या, आमचे नेते जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली बहे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. शैक्षणिक व आरोग्य या बाबींवर विशेष लक्ष देणार आहे.गावाच्या प्रगतीचा आलेख असाच चढता ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
यावेळी वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संग्रामसिंह पाटील,सरपंच छायाताई पाटील यांच्या हस्ते नूतन उपसरपंच प्रा.डॉ.सौ.पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संग्रामसिंह पाटील,राजारामबापू कारखान्याचे संचालक विठ्ठलराव पाटील,ऍड.कृष्णराव पाटील,सोसायटीचे माजी सभापती शिवाजीराव पाटील,मनोज पाटील,कृष्णा कारखान्याचे अमोल गुरव,सुजित पाटील,सोसायटीचे सभापती संभाजी पाटील,माजी सरपंच बी.जी.पाटील,माजी सरपंच सर्जेराव दमामे,कृष्णेचे माजी संचालक संभाजी दमामे,माजी सभापती शहाजी पाटील,प्रा.डॉ.सुनील पाटील,दिग्विजय पाटील,जयदीप पाटील,प्रा.डॉ.अशोक शिंदे,भगवान पाटील,शिवाजी पाटील,रामदास पाटील,जयराम पाटील,प्रा.मकरंद बडवे,जितेंद्र साळुंखे,माजी सरपंच सुधीर रोकडे,राजाराम गुरव,सुरज पाटील,अविनाश पाटील,प्रशांत थोरात,जालिंदर देशमुख,रोहित तोरस्कर,हणमंत नावडकर,शंकर नावडकर,मदन आरबुने आदींसह ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.












































































