Last Updated on 11 Oct 2022 6:07 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली | बळीराजा शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी गणेश हौशेराव शेवाळे यांची निवड करण्यात आली.संघटनेच्या कराड-पाचवड येथे झालेल्या पहिल्या ऊस परिषदेत ही निवड झहीर करण्यात आली.केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील,प्रदेशाध्यक्ष बीजी काका पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले .
शेतकरी महिला युवा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी गणेश शेवाळे यांचे अभिनंदन केले.मिळालेल्या पदाची जबाबदारी शेतकरी,कामगारांच्या न्यायासाठी मरेपर्यंत लढण्याची तयारी असल्याचे नूतन अध्यक्ष गणेश शेवाळे यांनी यावेळी सांगितले.
सातारा जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव,आटके गावचे अशोकराव पाटील,निवृत्त मेजर के.बी जाधव,मंगल चोरमारे,बजरंग जाधव चोरमारे,विलासराव पाटील,श्रीरंग देशमुख,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहाजी पाटील,बळीराजाचे सांगली जिल्हा अशोकराव सलगर,रयत क्रांती संघटनेचे जयवंत पाटील,तुकाराम मस्के,शामराव मस्के,सुप्रिया मस्के,बेबीताई खांडेकर,सुरज पाटील,प्रशांत होनमाने,नामदेव कारंडे,आनंदराव पाटील,प्रगतशील शेतकरी श्रीरंग पाटील,विराज पाटील,विशाल झेंडे आदींनी गणेश शेवाळे यांचा सत्कार केला.












































































