Last Updated on 23 Oct 2024 9:23 PM by Sanjay Patil/Adhorekhit
वायनाड । केरळमधल्या वायनाड मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून प्रियंका गांधी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी वायनाडमध्ये काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
त्याआधी त्या कलपेट्टा इथं आयोजित केलेल्या रोड शो मध्ये सहभागी झाल्या. वायनाडचा भाग होणं ही आपल्यासाठी आनंद आणि सन्मानाची बाब असल्याचं यावेळी प्रियांका गांधी म्हणाल्या. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी उपस्थित होते.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी वायनाडमध्ये काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. तसेच प्रियंका गांधी यांनी रोड शो करत वायनाडमधील मतदारांना अभिवादन केले.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत रायबरेली आणि वायनाड अशा दोन लोकसभा मतदारसंघांमधून विजय मिळाल्यानंतर वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा दिला होता.

त्यामुळे या मतदारसंघातील जागा रिक्त झाली होती. तिथे काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती. दरम्यान, आज प्रियंका गांधी यांनी रोड शो च्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रियंका गांधी यांच्या रोड शोमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे नेते उपस्थित होते. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी सकाळी ११ वाजता कलपेट्टा न्यू बस स्टँड येथून रोड शो ला सुरुवात केली.












































































