Last Updated on 20 Nov 2023 5:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय औषध निर्माण आयोगाची स्थापना करण्यासाठी आणि औषध निर्माण कायदा- 1948 रद्द करून; राष्ट्रीय औषध निर्माण आयोग विधेयक-2023 याला अंतिम स्वरूप देण्याचे ठरविले आहे.
त्यानुसार, राष्ट्रीय औषध निर्माण आयोगाच्या विधेयकाचा मसुदा तयार करण्यात आला असून तो 14 नोव्हेंबर 2023 रोजी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (बातम्या आणि विशेष विभागात) 10 नोव्हेंबर 2023 रोजी सर्वांसाठी अपलोड केला आहे.
या प्रस्तावित कायद्याला अधिक समृद्ध करण्यासाठी सामान्य लोक/भागधारकांच्याही सूचना/टिप्पण्या मागवलेल्या आहेत. या सूचना 14 डिसेंबर 2023 पर्यंत hrhcell-mohfw[at]nic[dot]in वर किंवा publiccommentsahs[at]gmail[dot]com वर ई-मेलद्वारे पाठवल्या जाऊ शकतात.
NPC बिल/20 नोव्हेंबर 2023/1 वर HFW/सार्वजनिक सूचना









































































