Last Updated on 20 May 2023 10:28 AM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
सातारा । नांदगाव (ता.कराड) येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे युवक कार्यकर्ते, उपक्रमशील ग्रामपंचायत सदस्य प्रशांत विश्वनाथ सुकरे यांना नुकतेच चंद्रभागा आयकॉन पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले.
प्रशांत सुकरे यांनी कोरोना काळात गावातील लोकांना स्वखर्चाने मोलाची मदत केली.तसेच गतवर्षी दक्षिण मांड नदीला पुर आला होता.त्याचा फटका नांदगाव सह नदिकाठच्या गावांना बसला.त्यावेळी नांदगाव व मनव मधील लोकांना त्यांनी स्वखर्चाने मदतिचा हात दिला. तसेच अन्य संस्थाकडून मदत मिळवून दिली.
त्या बरोबरच नांदगाव येथे ग्रामपंचायत सदस्य म्हणून गत अडीच वर्षात त्यांनी स्वखर्चाने अनेक उपक्रम राबविले आहेत.याची दखल घेत चंद्रभागा रुरल डेव्हलपर व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ यांच्या वतीने उपक्रमशील ग्रामपंचायत सदस्य म्हणून राज्यस्तरीय ‘चंद्रभागा आयकॉन 2023’ हा पुरस्कार सिनेअभिनेत्री सुरेखा कुडची,सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या हस्ते मानपञ व सन्मान चिन्ह देऊन प्रदान करण्यात आला.यावेळी उद्योजक दीपक लोखंडे,ज्ञानेश्वर शेवाळे आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा…
ग्रहणाशी डोळे भिडवणाऱ्या सावित्रीच्या लेकीला सदृढ कन्यारत्न; नुकतेच झाले ‘राजनंदिनी’ असे नामकरण











































































