Last Updated on 13 Jan 2022 8:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit
केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब योजना जाहीर करण्यात आली.राज्यातील शेतकऱ्यांना विश्वासार्ह, किफायतशीर आणि दिवसा निश्चित पद्धतीने वीज पुरवठा करण्यासाठी कृषी पंप वीज जोडण्यांना सौर ऊर्जेद्धारे विद्युतीकरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या अभियांनातर्गत पुढील 5 वर्षात 5 लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास व त्यापैकी पहिल्या वर्षासाठी मंजूर १ लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास मंजूरी.
सदर अभियान घटक महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मार्फत अर्जदारांचे On-line अर्ज मागवून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर अनुज्ञेयता तपासून राबविण्यात येणार आहे.
लाभार्थी निवडीचे पात्रता निकष – (३ व ५ अश्वशक्ती ) :
- शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत असलेली शेतजमीन असणे.
- पारंपारिक पध्दतीने कृषीपंपाकरिता विदयुत जोडणी न झालेले शेतकरी.
- ५ एकरापर्यंत शेतजमीन धारकास ३ अश्वशक्ती सौर कृषीपंप व ५ एकरापेक्षा जास्त शेतजमीन धारकास ५ अश्वशक्ती व ७.५ अश्वशक्ती सौर कृषीपंप देय असेल.
- यापुर्वी शासनाच्या कुठल्याही योजनेद्वारे कृषीपंपाचा लाभ न घेतलेले शेतकरी.
- अतिदुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यास प्राधान्य.
- वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने अद्याप विदयुतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी.
- “धडक सिंचन योजना” अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.
- महावितरणकडे विदयुत जोडणीसाठी पैसे भरुन प्रलंबित असलेले शेतकरीअर्जदार.
लाभार्थी निवडीचे पात्रता निकष ७.५ अश्वशक्ती सौर कृषीपंप करिता:
- विहिर किंवा कूपनलीका यापैकी जलस्त्रोत असणे आवश्यक आहे.
- अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार अतिशोषित, शोषीत आणि अंशत: शोषीत क्षेत्रामधील (गावांमधील) विहीरींमध्ये व कूपनलीकांमध्ये नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार नाही.
- अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार ज्या सुरक्षीत पाणालोट क्षेत्रांची उपशाची स्थिती (stage of extraction) ६० टक्के पेक्षा कमी आहे, अशा क्षेत्रातील गावांमधील विहीरींमध्ये व कूपनलीकांमध्ये नवीन सौर पंप देण्यास पात्र.
- खडकाचे क्षेत्रात खोदल्या जाणा-या विंधन विहीरी हे शाश्वत सिंचनाचे साधन नसल्यामुळे विंधन विहीरींमध्ये (Bore well), नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय आसणार नाही. मात्र गाळाचे क्षेत्रामध्ये खोदल्या जाणा-या कूप नलिका हे शाश्वत सिंचनाचे साधन असल्यामुळे सुरक्षीत क्षेत्रामधील कूपनलीकांमध्ये (Tube Well) अ.क्र.२ च्या अधीन राहून, नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार आहे.
- कोणत्याही वर्गवारीतील क्षेत्रामध्ये ६० मी. पेक्षा जास्त खोल असलेल्या विहीरींमध्ये अथवा कूपनलिकेमध्ये नवीन सौर पंप देण्यास पात्र नाही.
कृषीपंप नविन वीज जोडणी करिता अर्जाची प्रक्रिया
- महावितरणाच्या वेब पोर्टलवर (https://www.mahadiscom.in/solar) ऑनलाइन अर्ज करावा.
- सध्याच्या कृषीपंपाकरिता नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा करुन प्रलंबित असलेल्या अर्जदाराने फक्त काही अनिवार्य फील्ड, उदा. अर्ज क्रमांक, पैसे भरल्याची पावती क्रमांक, मंजुरी क्रमांक आणि क्षमतेची मागणी इ. तपशील देणे अनिवार्य आहे.
- नवीन अर्जदार (परंपरागत कृषीपंप नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा केलेला नाही) सर्व फील्ड अनिवार्य आहेत म्हणून तपशील भरणे आवश्यक आहे.
- ए – 1 फॉर्मवर संपूर्ण माहिती भरावीे सोबत (कागदपत्रांची प्रत अपलोड करावी)
- 7/12 उतारा प्रत
- आधार कार्ड
- कास्ट प्रमाणपत्र (एससी / एसटी लाभार्थींसाठी)
- अर्जदाराने ए – 1 फॉर्मवर व घोषणापत्रावर सही करणे आवश्यक आहे.
- ऑनलाइन ए – 1 फॉर्म प्राप्त झाल्यापासून 10 दिवसांच्या आत, सर्वेक्षण केल्यानंतर फील्ड ऑफिसमधून डिमांड नोट जारी केले जाईल. जर काही विसंगती आढळली तर त्यानुसार अर्जदाराला कळविण्यात येईल.
- डिमांड नोट देय झाल्यानंतर लाभार्थी एजन्सीचे नाव सादर करेल / देईल (केवळ 25000 निविदासाठी लागू आहे).
- प्रत्येक टप्प्यावर अर्जदारांना एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.
वर्गवारी निहाय लाभार्थी हिस्सा:
| वर्गवारी | लाभार्थी हिस्सा | ३ एचपी लाभार्थी हिस्सा | ५ एचपी लाभार्थी हिस्सा | ७.५ एचपी लाभार्थी हिस्सा |
|---|---|---|---|---|
| सर्वसाधारण | १०% | रु. १६५६०/- | रु. २४७१०/- | रु. ३३४५५/- |
| अनुसुचित जाती | ५% | रु. ८२८०/- | रु. १२३५५/- | रु. १६७२८/- |
| अनुसुचित जमाती | ५% | रु. ८२८०/- | रु. १२३५५/- | रु. १६७२८/- |
अधिकृत संकेतस्थळ https://www.mahadiscom.in/solar/ वर जावे.














































































