Last Updated on 24 Jul 2024 2:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
खुल्या गटात नेहा होनमाने व्दितीय,अनिकेत भंडारे तृतीय
लहान गट-प्रथम क्रमांक-शौर्य चौधरी,द्वितीय क्रमांक-पियुष जाधव,तृतीय क्रमांक-जमीर शिकलगार
मध्यम गट-प्रथम क्रमांक-हर्षवर्धन देशमुख,द्वितीय क्रमांक-राजवीर पाटील,तृतीय क्रमांक -कु.गौरी वझरे
सांगली । युवा नेते प्रतीक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाळवा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इस्लामपूर येथे आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.खुल्या गटात भरत बाळू नांद्रे (कलाविश्व महाविद्यालय,सांगली) यांनी प्रथम,नेहा प्रशांत होनमाने (इस्लामपूर ) यांनी दुसरा,तर अनिकेत बाळासो भंडारे (कलाविश्व महाविद्यालय,सांगली) यांनी तिसरा क्रमांक पटकाविला आहे. कु.तन्मय संजय अडसुळ या भाग्यवान विद्यार्थ्यास सायकल बक्षिस देण्यात आली.
स्पर्धेचा निकाल-लहान गट-प्रथम क्रमांक-शौर्य सुहास चौधरी (विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल,राजरामनगर),द्वितीय क्रमांक-पियुष संजय जाधव (इंग्लिश मिडियम स्कूल,नेर्ले),तृतीय क्रमांक-जमीर शिकलगार (जि.प.उर्दू शाळा,इस्लामपूर) मध्यम गट-प्रथम क्रमांक-हर्षवर्धन दिलीप देशमुख (कै.पां.स पाटील विद्यालय,तांबवे ), द्वितीय क्रमांक-राजवीर तानाजीराव पाटील (विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल, राजारामनगर),तृतीय क्रमांक -कु.गौरी गोपाळ वझरे (इंग्लिश मीडियम स्कुल नेर्ले). कासेगाव शिक्षण संस्थेतील कला शिक्षकांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव,महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने,केआरपी कॉलेजचे प्राचार्य डॉ.टी. जी.शिंदे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी प्रा.शरद पाटील,प्रा.प्रशांत पाटील,प्रविण पाटील,प्रमोद पाटील,सुहास पवार,विशाल माने प्रामुख्याने उपस्थित होते.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजकेदार आटुगडे,कार्याध्यक्ष सुशांत कुराडे, अनिरुद्ध पाटील,पृथ्वीराज पाटील,सर्वेश देसावळे,विनायक बेडके,रामचंद्र पाटील, शिवराज यादव,संकेत येळावकर,धनंजय जाधव,हर्षवर्धन मोहिते,देव निर्वाने,बसवराज पाटील,अथर्व पाटील तसेच पदाधिकारी व सदस्यांनी स्पर्धेचे उत्कृष्ठ नियोजन केले.











































































