Last Updated on 02 Oct 2023 8:57 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राज्याचे माजी मंत्री,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील हे राज्याच्या राजकारणात व्यस्त असताना त्यांचे सुपुत्र,राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी तालुक्याची,इस्लामपूर मतदारसंघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत गणेशोत्सव काळात तालुक्याचा दौरा करून साधारण 250 च्यावरती गणेश मंडळांच्या आरत्या केल्या.
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी,सामान्य माणूस हवालदिल झालेला आहे,त्यांना या परिस्थितीशी दोन हात करण्याचे बळ दे,असे साकडे त्यांनी श्रींच्या चरणी केले.गावोगावचे युवा कार्यकर्ते,जेष्ठ,महिला व ग्रामस्थांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

प्रतिक पाटील यांनी नेर्ले गावातून आपल्या आरती दौऱ्याची सुरुवात केली.यानंतर त्यांनी इस्लामपूर,आष्टा या मोठ्या शहरासह पेठ,कामेरी,बहे,कि.म.गड,येडे मच्छिंद्र,कसबे डिग्रज आदी गावांचा दौरा करून साधारण 250 च्या वरती गणेश मंडळाच्या आरत्या केल्या आहेत.
रात्री उशिरापर्यंत आरत्या कार्यक्रम सुरू होते. त्यांनी अनेक मंडळांना भेटी दिल्या.सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजा च्या हिताचे विविध उपक्रम राबविलेल्या मंडळांचे त्यांनी कौतुक केले.
या दौऱ्यात त्या-त्या गावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.










































































