Last Updated on 27 Sep 2023 8:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सांस्कृतिक मंडळाने गणेशोत्सवानिमित्त आयोजित राजारामबापू मॅरेथॉन स्पर्धेत साखराळे युनिटच्या अतुल मंडले यांनी पहिला,वाटेगाव-सुरुल युनिटचे रितेश पाटील यांनी दुसरा,तर अवधूत पाटील यांनी तिसरा क्रमांक पटकाविला आहे.कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या हस्ते विजेत्या कामगार व महिलांचा सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी गौरी-गणपती गृह सजावट,रांगोळी,कामगार कलाविष्कार व रस्सीखेच स्पर्धेतील विजेत्यांनाही बक्षिस वितरण करण्यात आले. या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.
प्रतिकदादा पाटील म्हणाले,कामगार हा आपल्या संस्थेचा मुख्य घटक असून आपल्या साठी विविध उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न असेल. ऑफ सिझनमध्ये कामगारांच्या साठी विविध सांघिक व व्यक्तिगत स्पर्धा घेवू. याप्रसंगी संचालक कार्तिक पाटील,दादासो मोरे,शैलेश पाटील,अमरसिंह साळुंखे, कामगार नेते शंकरराव भोसले,महेश पाटील, एस.डी.कोरडे,विजय मोरे,सुनील सावंत, संताजी चव्हाण,संभाजी सावंत,संग्राम चव्हाण,उमेश शेटे,तानाजी खराडे,राजेंद्र चव्हाण,विश्वनाथ पाटसुते,अनिल पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
मॅरेथॉन स्पर्धा- तुषार लोहार वाटेगाव,अंकुश देसाई (वाटेगाव),विजय देसाई (वाटेगाव),प्रवीण बसुगडे (साखराळे),संदीप पाटील (वाटेगाव),धनाजी पाटील (साखराळे),विनायक देसाई (साखराळे),सुशिल वाळखिंडे (साखराळे),विकास देसाई (साखराळे), किशोर जेजुरकर (साखराळे),सूरज हाके (कारंदवाडी),सतिश इरकर (साखराळे) यांनी चार ते पंधरा पर्यंतचे क्रमांक पटकाविले.
गौरी-गणपती गृह सजावट स्पर्धा- साखराळे युनिट (अधिकारी वर्ग) प्रथम- सौ.अपर्णा सावंत,द्वितीय-सौ.सविता पवार, तृतीय-सौ.संगीता खोत,चतुर्थ- सौ. मनीषा सन्मुख. (कामगार वर्ग) प्रथम-सौ.सुषमा गोसावी,द्वितीय- सौ.नंदाताई शिंदे,तृतीय- श्रीमती कुसुम रकटे,चतुर्थ-सौ.अर्चना परीट, वाटेगाव-सुरुल युनिट-कामगार वर्ग-प्रथम- सौ.विजया खोत,द्वितीय-सौ.शोभा लोंढे, तृतीय-सौ.उर्मिला माने.
रांगोळी स्पर्धा-साखराळे युनिट महिला वर्ग-प्रथम-सौ.काजल सुर्यवंशी,द्वितीय- सौ.सविता पवार,तृतीय-सौ.रविना पाटील, चतुर्थ-सौ.स्वाती इंगळे,पंचम-सौ.निलम कणसे,मुली गट-प्रथम-कु.सानिका केंगार, द्वितीय-कु.मानसी जाधव,तृतीय-कु.मयुरी शिंदे
रस्सीखेच स्पर्धा- (सांघिक) प्रथम- साखराळे युनिट-शेती व केनयार्ड विभाग, द्वितीय-वाटेगाव-सुरुल युनिट-इंजिनीअरिंग विभाग,तृतीय-कारंदवाडी युनिट-इंजिनिअर व उत्पादन विभाग,चतुर्थ-राजारामनगर मित्र परिवार
कामगार कलाविष्कार- प्रथम-निलेश साठे,द्वितीय-सौ.अश्विनी वाडेकर,तृतीय- फिरोज मुलाणी,चतुर्थ-ज्योती पवार,पंचम- राजाराम साठे,उत्तेजनार्थ-प्रकाश खोत,शेखर रासाटे.संग्राम साठे यांचा हलगी-घुमके,दांड पट्टा मर्दानी खेळ
प्रतिकदादांनीही मॅरेथॉन स्पर्धा धावत केली पूर्ण..!
प्रतिकदादा पाटील हे धावण्याच्या तयारीने सकाळी वाळवा पंचायत समितीच्या आवारात आले. त्यांनी इथून करखान्यापर्यंत साधारण साडेतीन किलोमीटर अंतर धावत पूर्ण केले. यामुळे कामगारांच्यामध्ये नवा उत्साह संचारला. प्रारंभी प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवास व तहसिलदार प्रदीप उबाळे यांनी पंचायत समितीच्या आवारात लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून,झेंडा दाखवून स्पर्धेचा शुभारंभ केला.ही मॅरेथॉन झरी नाका,आझाद चौक,लाल चौक,गांधी चौक,यल्लाम्मा चौक,कचेरी मार्गे कारखान्यावर पोचली.












































































