Last Updated on 26 Jan 2022 11:03 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई |
देशभरात 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. इंटरनेट सर्च इंजिन गुगलनेदेखील भारतीयांना प्रजासत्ताक दिनानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत.प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गुगलने एक खास डुडल तयार केले आहे.त्यातून भारतीय संस्कृती आणि भारतीय वारसा पहायला मिळत आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आज दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनात भारताची सांस्कृतिक विविधता,लष्करी सामर्थ्य दिसून येणार आहे.गुगलच्या डुडलमध्ये गुगलच्या डुडलमध्ये उंड, हत्ती, घोडे, ढोल आणि संचलन मार्ग, आयकॉनिक कॅमल-माउंटेड बँडचा भाग म्हणून सॅक्सोफोन, कबूतर आणि राष्ट्रध्वज दर्शवणारा तिरंगा रंगाचा समावेश करण्यात आला आहे.गुगलने मागील वर्षीही ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतील अनेक संस्कृतीची झलक दाखवली होती. तर ७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रंगीबिरंगी डुडल तयार केले होते. गुगलने आपल्या गुगलच्या डुडलमध्ये राष्ट्रीय पक्षी मोर, विविध कलाप्रकार आणि नृत्यप्रकार दाखविलेले होते.गुगलच्या डुडलमुळे संपूर्ण जगात भारताची संस्कृती आणि वारसा पोहोचत आहे, प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची बाब आहे.












































































