Last Updated on 30 Oct 2024 10:46 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । महाराष्ट्रातील विधानसभा निडवणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली जात आहे. काँग्रेसने ४० प्रचारकांची यादी आजच जाहीर केली. त्याचबरोबर आता उद्धव ठाकरे गटाकडूनही २४ स्टार प्रचारकांची यादी जाहीर करत महाविकास आघाडीकडून प्रचारात आघाडी घेतली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू झाला असून सर्व राजकीय पक्ष आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करत आहेत. आता काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जारी केली आहे. या यादीत पक्षाने ४० नावांची घोषणा केली आहे.काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली आहे. राहुल गांधी सोनिया गांधी यांच्यासह इतर नेते प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला विशेषत: महाराष्ट्रात चांगले यश मिळाले आहे. या यशानंतरच काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुद्धा विजयासाठी कारणीभूत ठरली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न हा काँग्रेसचा असणार आहे.
काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी
मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, के.सी. वेणुगोपाल, रमेश चेन्नीथाला, अशोक गहलोत, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, सिद्धारमय्या, भूपेश बघेल, रेवंत रेड्डी, चरणजीत सिंह चन्नी,डी.के. शिवकुमार, सचिन पायलट, रणदीप सुरजेवाला, जी परमेश्वरा, एम.बी. पाटील, कन्हैया कुमार, इमरान प्रतापगढी, अलका लांबा, के जी जॉर्ज, के जयकुमार, जिग्नेश मेवाणी, नदीम जावेद, सलमान खुर्शीद, राजीव शुक्ला, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, चंद्रकांत हंडोरे, वर्षा गायकवाड, आरिफ नसीम खान, प्रणिती शिंदे, सतेज पाटील, विलास मुट्टेमवार, अशोक उर्फ भाई जगताप, अमित देशमुख, विश्वजीत कदम
शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेसाठी ९६ उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकरून आता स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात २४ जणांचा समावेश आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली.
उद्धव ठाकरे गटाची स्टार प्रचारकांची यादी
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत, भास्कर जाधव, अनिल देसाई, विनायक राऊत, आदेश बांदेकर, अंबादास दानवे, नितीन बानुगडे पाटील, प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहिर, सुषमा अंधारे, संजय (बंडू) जाधव, किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे, संजना घाडी, जान्हवी सावंत, शरद कोळी, ओमराज निंबाळकर, आनंद दुबे, किरण माने, प्रियांका जोशी, लक्ष्मण वडले









































































