Last Updated on 24 Jun 2023 5:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । संपुर्ण भारत देश सर्व पातळीवर सर्वात्तम कामगिरी करत आहे, संपुर्ण जगाचे लक्ष भारत देशाच्या आधुनिक प्रगतीवर आहे. देश महासत्ता बनत असताना शिक्षण व आरोग्य सेवा ही सुलभ होण्यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत, शिक्षण व्यवस्थेतील बदल व आरोग्य सेवेतील अत्याधुनिकता जपत प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलाचे शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील काम आदर्शवत व सांगली जिल्ह्याच्या विकासात भर घालणारे असल्याचे मत जेष्ठ पत्रकार,लेखक डॉ.उदय निरगूडकर यांनी व्यक्त केले.
डॉ.उदय निरगूडकर यांनी आज उरुण-इस्लामपुर येथील प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलाला भेट दिली यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलाचे संस्थापक, इस्लामपुर विधानसभा मतदार संघाचे प्रमुख व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांनी त्याचे स्वागत केले. यावेळी निरगुडकर यांनी सर्व विभागाची पहाणी करुन कौतुक केले.
डॉ.उदय निरगुडकर म्हणाले,सांगली जिल्ह्याला राजकीय,सामाजीक, क्रांतीकारक, साहित्यिक,लेखक,कवी,शिक्षण महर्षी यांचा मोठा वारसा आहे,या जिल्ह्यामध्ये स्व.वसंतदादा पाटील,क्रांतीसिंह नाना पाटील,पी.सावळाराम,आण्णाभाऊ साठे,पठ्ठे बापुराव,कर्मवीर आण्णा यांच्यासारखी रत्ने घडली,याच लोकांनी आपल्या सांगली जिल्ह्याची ओळख संपुर्ण महाराष्ट्रभर, देशभर व जगभर ही पोहचविली, त्याचा विचार घेऊन आज काम करण्याची गरज आहे.
शिक्षण व आरोग्य क्षेत्र हे देशाच्या प्रगतीत भर घालणारे क्षेत्र आहे.शिक्षण व आरोग्य हा देशाच्या विकासाचा पाया असुन स्व.वसंतदादांनी या क्षेत्राला खर्या अर्थाने संजीवनी मिळवुन दिली आहे, शिक्षण धोरण खुले केल्याने महाराष्ट्राच्या वाडी वस्ती पर्यत शिक्षण पोहचले,शिक्षणामुळेच महाराष्ट्राच्या वाडी वस्तीवरील मुलं देश व देशाबाहेर जाऊन आपली ओळख निर्माण करु शकली,शिक्षण व आरोग्य क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन लोकांनी बदलला पाहिजे,त्यांना प्रोत्साहान देण्यासाठी पुढे आले पाहिजे,देशातील शिक्षण व आरोग्य सेवा टिकली तरच तुम्ही आम्ही सक्षमपणे उभा राहु असे शेवटी उदय निरगुडकरांनी मत व्यक्त केले.
यावेळी डॉ.विरेंद्र मिनकिरे,डॉ.अभिमुन्य पाटील यांनी संस्थेच्या शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील प्रगतीबाबत माहिती दिली.यावेळी वाळवा तालुका भाजपा अध्यक्ष धैर्यशील मोरे,वाळवा तालुका भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष मधुकर हुबाले,वाळवा तालुका भाजपा उपाध्यक्ष निवास पाटील,वाळवा तालुक भाजपा युवा मोर्चा चे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,भाजपा शहर उपाध्यक्ष आबासाहेब मोरे,भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष संजय पोरवाल,जिल्हा सरचिटणीस संजय हवलदार,वाळवा तालुका भाजपा संघटन सरचिटणीस संदीप सावंत,सरचिटणीस यदुराज थोरात,भाजपा शहर संघटन सरचिटणीस प्रविण परीट,निशिकांत दादा स्पोटर्स फौंडेशन चे संस्थापक अजित पाटील,प्रांजली अर्बन निधी बॅकेचे चेअरमन अक्षय पाटील,अक्षय कोळेकर, सुयश पाटील, अरुण शिंगण, संदीपराज पवार, गौरव खेतमर, अल्ताफ तहसिलदार, सोमनाथ जाधव आदिसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रकाश हॉस्पिटलचे कोरोना संकटातील काम कौतुकास्पद
यावेळी डॉ. निरगूडकर म्हणाले,कोरोनाचे संकट हे सर्वासाठी युध्दासारखे होते.या काळात प्रकाश हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर ने फक्त सांगली जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातुन आलेल्या रुग्णांना सेवा दिली.अनेक रुग्ण व नातेवाईकांचे अभिप्राय ही डॉक्टर व सहकारी स्टाफ प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे कौतुक करणारे होते.या हॉस्पिटल मधील सेवा देणारा ॲम्ब्युलन्स ड्राव्हर गमावला याचे दु:ख वाटते, प्रकाश हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर मधुन मिळालेल्या सेवेचे कौतुक अनेक ठिकाणी मला ऐकायला मिळाले आहे. भविष्यात आरोग्य विकासासाठी या हास्पिटल ला आवश्यक ती मदत करण्यास मी तयार असल्याचे निरगुडकर यांनी सांगितले.









































































