Last Updated on 16 Oct 2024 9:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर येथील प्रकाश पब्लिक स्कूलमध्ये प्रथमच ‘डिजीटल फेस्ट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा भारतातील प्रथमच कार्यक्रम असून तो शनिवार दि.१९ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती प्रकाश पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. मधुकुमार.ए.नायर यांनी दिली.
डॉ. मधुकुमार.ए.नायर म्हणाले, शाळेचे संस्थापक निशिकांत भोसले-पाटील (दादा), प्रशासिका सुनिता भोसले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन डी.वाय.पाटील अग्रीकल्चर अॅण्ड टेक्निकल कॉलेज, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. के. प्रतापनयांच्याहस्ते होणार असून भारतातील विविध राज्यातील सीबीएससी शाळा या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये विद्यार्थी आपले कौशल्य दाखवत रोबोटिक्स विषयाला अनुसरून नाविन्य पूर्ण प्रकल्प सादर करणार आहेत. तसेच शाळेचे शिक्षक आपापल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व शाळांनी डिजीटल फेस्ट या कार्यक्रमात सहभागी रहावे.












































































