Last Updated on 11 Oct 2022 6:15 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । जिल्ह्यातील 8 पोलीस अधिका-यांच्या आज (सोमवारी) जिल्हयातंर्गत बदल्या करण्यात आल्या. मिरज ग्रामीणच्या पोलीस निरीक्षकपदी नारायण देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 22 न (2) अन्वये जिल्हा पोलीस आस्थापना मंडळास प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन,जिल्हा पोलीस आस्थापना मंडाळाच्या मान्यतेने जिल्ह्यातील रिक्त पदावर पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.मिरज शहर,मिरज ग्रामीण,वाहतूक शाखा यांचा यात समावेश आहे.
मिरज ग्रामीणच्या पोलीस निरीक्षकपदी नारायण देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.देशमुख यांनी यापूर्वी इस्लामपूर येथे पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहे.या काळात त्यांनी इस्लामपूर परिसरात सर्वाधिक मोक्का कारवाया,तडीपारीचे गुन्हे,शहरात सीसीटीव्ही अशा अनेक मार्गाने खासगी सावकारी,गुंडगिरी यांच्यावर वचक ठेवला.मोक्का,एमपीडीए,तडीपारीच्या कारवाया केल्या. शहर व परिसरातील गुन्हेगारीला आळा घालून कडक कारवाया करण्यासाठी अतिशय निष्ठेने वेळ देवून निरीक्षक देशमुख यांनी प्रॉपर पोलिसींग केले.
पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना महाराष्ट्र पोलीस दलाचे महासंचालक पदक मिळाले आहे.निरीक्षक देशमुख यांनी आपल्या 20 वर्षाच्या सेवेत केलेले अनेक गंभीर व किचकट गुन्ह्यांचे तपास,बाल व महिला लैंगिक अत्याचार प्रकरण,चोरीचे गुन्हे तसेच इस्लामपूर येथील विद्यार्थ्याच्या अपहरण प्रकरणाचा यशस्वी तपास केले आहेत. यापुर्वीही त्यांना चांगल्या सेवेबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत.सन 1999 मध्ये ते पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले.सन 2009 मध्ये सहाय्यक पोलीस निरिक्षक तर सन 2014 ला पोलीस निरीक्षक म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली.गडचिरोली,रायगड,ठाणे,मुंबई येथे यापुर्वी त्यांनी सेवा बजावली आहे.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे अशी :














































































