Last Updated on 25 Mar 2022 10:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे.आयोगाने 2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.यामधील पोलीस उपनिरीक्षक पदांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.पोलीस उपनिरिक्षक पदाच्या 496 पदापैकी 494 पदांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पुण्याच्या निलेश विलास बर्वे यानं राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर, अहमदगनरचा विजय सैद यानं मागासवर्गीय प्रवर्गातून पहिला क्रमांक पटकवला आहे. मुलींमध्ये कोल्हापूरची सुप्रिया रावण ही पहिली आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या माहितासाठी वेबसाईटवर निकाल जाहीर केला आहे.
दरम्यान, संयुक्त पूर्व परीक्षा त्यानंतर मुख्य परीक्षा, मैदानी परीक्षा आणि मुलाखत अशा चार अवघड टप्प्यातून पार झाल्यानंतर पास झालेल्या या उमेदवारांचे फौजदार होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवड झालेल्या 494 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.यानंतर यशस्वी उमेदवारांची कागदपत्रे तपासण्यात येणार आहेत यामध्ये एखाद्या उमेदवारांच्या कागदपत्रात विसंगती आढळल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल, असे आयोगाकडून कळवण्यात आले आहे.
पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल












































































