Last Updated on 08 Nov 2023 2:44 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । पेठ येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी येत्या डिसेंबरमध्ये तात्काळ निधी वितरित करण्याचे आदेश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले,तसेच पुढील वर्षासाठीची विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया देखील सुरू करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मौजे पेठ (ता. वाळवा जि. सांगली) येथे क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय मंजूर झालेले असून अपुऱ्या शासकीय निधीमुळे इमारत बांधकाम पूर्ण स्थितीत झालेले नाही.त्यामुळे हे महाविद्यालय सुरू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना या अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाचा लाभ घेता येत नाही.(‘अधोरेखित’ च्या Facebook ला लाईक किंवा फॉलो करा)
त्या अनुषंगाने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मागणीनुसार राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीमध्ये आज मंत्रालय,मुंबई येथे बैठक घेण्यात आली.
या बैठकीत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी येत्या डिसेंबरमध्ये तात्काळ निधी वितरित करण्याचे आदेश विभागाला दिले,तसेच पुढील वर्षासाठीची विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया देखील सुरू करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे अधिकारी तसेच इतर मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते.












































































