Last Updated on 05 Oct 2023 8:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सिंधुदुर्गनगरी | पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.5 वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.8 वी दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदिपकुमार कुडाळकर यांनी दिली.
या परीक्षेसाठी आवेदन पत्र ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे आहे.परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर पसिध्द करण्यात आली आहे. शाळा माहिती पत्र नियमित शुल्कासह आवेदन पत्र भरण्याचा कालावधी दि. 1 सप्टेंबर ते 30 नोंव्हेबर 2023 असा आहे. शाळा माहिती पत्र, विलंब शुल्कासह आवेदन पत्र भरण्याचा कालावधी दि. 1 ते 15 डिसेंबर 2023 असा आहे. शाळा माहिती पत्र, अतिविलंब शुल्कासह आवेदन पत्र भरण्याचा कालावधी दि. 16 ते 23 डिसेंबर 2023 असा आहे. शाळा माहिती पत्र, अति विशेष विलंब शुल्कासह आवेदन पत्र भरण्याचा कालावधी दि. 24 ते 31 डिसेंबर 2023 असा आहे.
परीक्षेचे वेळापत्रक,स्वरुप,पात्रता निकष,परीक्षेचे माध्यम,परीक्षेचे शुल्क भरण्याची पध्दत इत्यादी व इतर बाबीं विषयीची सूचना परीक्षेच्या अधिसूचनेत परिषदेच्या संकेत स्थळावर पसिध्द करण्यात आलेली आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे वेळीच भरण्यात यावीत.












































































