Last Updated on 23 Aug 2022 7:23 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार, दि. 31 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात आली आहे.
ही उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात आली आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन स्वरूपात करता येईल. त्रुटी / आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दि. 28 ऑगस्ट 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात (विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग इत्यादी) दुरूस्ती करण्यासाठी दि. 28 ऑगस्ट 2022 रोजीपर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.
अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
अंतरिम उत्तरसूची











































































