Last Updated on 23 Feb 2024 9:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे | कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत येत्या २ मार्च रोजी बारामती येथे आयोजित मेळाव्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे १२० पेक्षा जास्त खाजगी उद्योजकांनी आत्तापर्यंत सहभाग दर्शविला असून त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे २० हजार पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आली आहेत, अशी माहिती कौशल्य विकास विभागाच्या उपआयुक्त अनुपमा पवार यांनी दिली आहे.
उमेदवारांनी मेळाव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखतीस येताना सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या (रिज्युम) व आधारकार्डच्या प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. या संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी व आस्थापनांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी पुणे विभागातील संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे संपर्क साधावा, असेही श्रीमती पवार यांनी कळविले आहे.













































































