Last Updated on 27 Dec 2024 8:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । हवामान खात्याने नंदुरबार जिल्ह्यात दिलेल्या येलो अलर्ट नंतर आज नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. कुठे दमदार तर कुठे तुरळक पावसाच्या सरी बरसल्याचे चित्र नंदुरबारमध्ये दिसून आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील काकर्दे येथे जवळपास अर्धातास मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या आहे. या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील पिकांना फटका बसणार आहे. तर धडगाव तालुक्यातील आंबा उत्पादनावर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोहर येण्याचा दिवसात या दमदार पावसाच्या सरी कोसळत असल्याने त्याचा फटका शेतकऱयांना बसणार असल्याचे दिसून येत आहे.
वायव्य आणि मध्य भारताच्या काही भागात मेघगर्जनेसह वादळी वारे
वायव्य आणि मध्य भारताच्या काही भागात आज मेघगर्जनेसह वादळी वारे आणि गारपिटीचा अंदाज असून, हवामान विभागानं या भागाला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग, पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात अतिवृष्टी आणि गारपिटीची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
Courtesy : Prasar Bharati









































































