Last Updated on 21 Sep 2022 4:29 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
![]()
सांगली । पलूस येथील घोरपडे मळ्यात सोमवारी मिळून आलेल्या मगरीला वनविभागाने कृष्णाकाठी सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडले.
पलूस येथे श्री. घोरपडे यांच्या शेततळ्यात मगर असल्याचे माहिती सोमवारी निदर्शनास आले.त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी कडेगाव-पलूस यांचे कार्यालयातील वन कर्मचारी यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता श्री.घोरपडे यांच्या शेततळ्यात मगर आढळून आली.

वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्रीमती नीता कट्टे,सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) डॉ. अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेगावच्या वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती पल्लवी चव्हाण,वनपाल मारुती ढेरे,वनरक्षक शहाजी ठवरे व प्राणीमित्र मोहसीन सुतार यांनी शेततळ्यातील पाणी कमी करून सदर मगरीस सुखरूपरीत्या बाहेर काढले.
पशुवैद्यकीय अधिकारी पलूस यांचेकडून मगरीची तपासणी करून नंतर मगरीस कृष्णाकाठी सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. कोणताही वन्यप्राणी घरामध्ये अथवा आपल्या परिसरामध्ये आढळून आल्यास किंवा सापडल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ वनविभागास १९२६ या टोल फ्री क्रमांकावर दयावी असे आवाहन कडेगावच्या वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती पल्लवी चव्हाण यांनी केले आहे.
![]()












































































