Last Updated on 22 Dec 2025 6:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
परिवहन विभागाची सूचना
सातारा | परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन इत्यादी सेवांशी संबंधित बनावट वेबसाइट्स, फसवे मोबाईल ॲप्स (APKS), तसेच मोबाइल SMS/WhatsApp द्वारे पाठविल्या जाणाऱ्या खोट्या लिंक मोठ्या प्रमाणात नागरिकांना फसवित आहेत. यामुळे सर्व वाहन चालक, मालक यांची आर्थिक फसवणूक, वैयक्तिक माहितीची चोरी तसेच नागरिकांच्या ओळखीचा गैरवापर होत असल्याचे आढळून आले आहे.
सर्व वाहन चालक, मालक यांनी परिवहन विभागाच्या खालील अधिकृत शासकीय संकेतस्थळांचा वापर करावा : १) वाहन नोंदणी सेवा (VAHAN) https://vahan.parivahan.gov.in. , ड्रायव्हिंग लायसन्स सेवा (SARATHI) https://sarathi.parivahan.gov.in. , परिवहन सेवा https://www.parivahan.gov.in. .ई-चलन, https://echallan.parivahan.gov.in
वरील सर्व अधिकृत संकेतस्थळे “.gov.in” ने समाप्त होतात. “.com”, “online”, “site”, “in” अ डोमेनवरील कोणत्याही वेबसाइटवर नागरिकांनी उघडू नये.
फसवणूक करणा-यांकडून पाठविले जाणारे संदेश बहुधा खालीलप्रमाणे असतात
आपल्या वाहनाचे चलन बाकी असून त्वरित दंड भरण्याची धमकी देण्यात येते व अनधिकृत लिंक पाठविण्यात येऊन त्वरित दंड भरण्याचे संदेश प्राप्त होतात.
DL (वाहन चालविण्याचा परवाना) सस्पेंड होणार आहे. त्वरित तपासणी करा.”
RTO कार्यालय किंवा परिवहन विभागाकडून नागरिकांच्या मोबाईलमध्ये कधीही WhatsApp द्वारे पेमेंट। पाठविली जात नाही, याची नोंद घ्यावी.
तसेच “RTO Services .apk”,”mParivahan_Update.apk”, “eChallan_Pay.apk” अशा अनधिकृत APK ॲप्स डाउनलोड करू नयेत, कारण त्याद्वारे OTP, बैंकिंग माहिती व मोबाईलमधील इतर संवेदनशील माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते.
नागरिकांनी कोणताही संशयास्पद संदेश/लिंक प्राप्त झाल्यास तात्काळ खालील ठिकाणी तक्रार नोंदवावी:
➤ राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टल https://www.cybercrime.gov.in
➤ सायबर फसवणूक हेल्पलाइन – १९३०
➤ जवळचे जिल्हा सायबर पोलीस स्टेशन









































































