Last Updated on 06 Mar 2025 3:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पाकिस्तानचा अवैध कब्जा असलेला काश्मीरचा भाग परत मिळाल्यावर काश्मीरचा संपूर्ण प्रश्न सुटेल
लंडन : पाकिस्तानचा अवैध कब्जा असलेला काश्मीरचा भाग परत मिळाल्यावर काश्मीरचा संपूर्ण प्रश्न सुटेल, असं वक्तव्य परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी केलं आहे. जयशंकर सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर असून लंडन मध्ये आयोजित एका कार्यक्रमात पाकिस्तान आणि काश्मीर मुद्द्यासंदर्भात ते बोलत होते.
ते म्हणाले, “पाकिस्ताने बळकावलेला भारताचा भाग (पाकव्याप्त काश्मीर) परत भारताला मिळण्याची आम्ही वाट पाहतोय. तो हिस्सा भारताकडे परत आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये शांतता निर्माण होईल.” जयशंकर यांना काश्मीर खोऱ्यात शांतता निर्माण करण्याचा भारताचा फॉर्म्युला विचारला असता ते म्हणाले, “जम्मू-काश्मीरमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी तीन टप्प्यांचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. आम्ही त्यावर काम करत असून अर्ध्याहून अधिक काम पूर्ण झालं आहे.”
लंडनमधील थिंक टँक चॅथम हाउसमध्ये ‘भारताचा उदय व वैश्विक भूमिका’ या विषयावर ते बोलत होते.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 31 Aug 2026 9:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit नियमावलीचे पालन करणे बंधनकारक सांगली | सांगली जिल्ह्यातील सर्व कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल) अशा तत्सम आस्थापनांना जिल्हाद... Read more













































































