Last Updated on 04 Mar 2025 8:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यांमध्ये संपर्क मंत्री म्हणून ११ मंत्र्यांची नेमणूक केली आहे.
गुलाबराव पाटील हे परभणी आणि बुलढाणा जिल्ह्याचे, उदय सामंत मुंबई उपनगर, पुणे आणि सिंधुदुर्ग, शंभूराज देसाई हे सांगली आणि अहिल्यानगर, संजय राठोड नागपूर, चंद्रपूर आणि अमरावतीचे संपर्क मंत्री म्हणून काम करतील.
दादाजी भुसे धुळे आणि नंदूरबार, प्रताप सरनाईक पालघर आणि सोलापूर, भरत गोगावले हे हिंगोली आणि वाशीम, संजय शिरसाठ हे बीड आणि नांदेड, प्रकाश आबीटकर हे अकोला आणि लातूर, आशिष जैस्वाल भंडारा आणि गोंदिया तर योगेश कदम हे जालना जिल्ह्याचे संपर्क मंत्री असतील.
पालघर आणि नाशिकचं पालकमंत्रीपदाचा निर्णय अजून झालेला नसल्याचं या दोन्ही जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्र्यांची नियुक्ती शिवसेनेनं केलेली नाही.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 01 Aug 2026 9:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit मुंबई । मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, मेघगर्जना, विजांचा... Read more








































































