Last Updated on 27 Oct 2024 11:25 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । अंधेरी पश्चिम मतदारसंघात उमेदवारी जाहीर झालेले सचिन सावंत यांनी या मतदारसंघातल्या त्यांच्या उमेदवारीचा फेरविचार करण्याची विनंती पक्षश्रेष्ठींना केली आहे.
आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची १६ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. यादीत खामगावमधून राणा सानदा, मेळघाट मतदार संघातून डाॅ. हेमंत चिमोटे यांना, गडचिरोलीतून मनोहर पोरेटी , दिग्रसमधून माणिकराव ठाकरे यांना, तर नांदेड दक्षिण मधून मोहनराव आंबाडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. देगलुर मधून निवृत्तीराव कांबळे, मुखेडमधून हणमंतराव पाटील, मेळगाव सेंट्रलमधून इजाज बेग, चांदवड मधून शिरीषकुमार, इगतपुरीतून लखीभाऊ जाधव, तर भिवंडी पश्चिममधून दयानंद चोरगे निवडणुकीच्या रिंगणात उभे असतील. अंधेरी पश्मिच मधून सचिन सावंत, वांद्रे पश्चिम मधून असिफ झकेरीया, तुळजापूर मतदार संघातून कुलदीप धीरज, कोल्हापूर उत्तर मधून राजेश लाटकर, तर सांगलीतून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, अंधेरी पश्चिम मतदारसंघात उमेदवारी जाहीर झालेले सचिन सावंत यांनी या मतदारसंघातल्या त्यांच्या उमेदवारीचा फेरविचार करण्याची विनंती पक्षश्रेष्ठींना केली आहे. आपल्याला वांद्रे पूर्व मधून निवडणूक लढवण्याची इच्छा होती, मात्र ती जागा मविआत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेली आहे, त्यामुळे अंधेरी पश्चिमची जागा आपल्याला देण्यात आली आहे, मात्र पक्षानं हा निर्णय बदलावा, अशी विनंती,
महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याकडे केली असल्याचं सचिन सावंत यांनी समाजमाध्यमावर सांगितलं आहे.








































































