Last Updated on 22 Oct 2022 5:08 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोजगार मेळावा -10 लाख कर्मचार्यांसाठी भरती मोहिमेला केला प्रारंभ
नवी दिल्ली । धनत्रयोदशीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 75 हजार तरुणांना रोजगाराची भेट दिली.पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या तरुणांना नियुक्तीपत्रे दिली.यासोबतच पंतप्रधानांनी व्हर्च्युअल रोजगार मेळावाही सुरू केला. याद्वारे केंद्र सरकारच्या 38 विभागांमध्ये पुढील 14 महिन्यांत म्हणजेच डिसेंबर 2023 पर्यंत 10 लाख रिक्त पदे भरली जातील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आभासी रोजगार मेळा सुरू केला. यावेळी त्यांनी ७५ हजार तरुणांना केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये नोकरीसाठी नियुक्ती पत्रांचे वाटप केले. ज्या पदांची भरती करण्यात आली आहे त्यात सेंट्रल फोर्स, सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल, लोअर डिव्हिजन क्लर्क,स्टेनो,पर्सनल असिस्टंट,इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर आणि मल्टी टास्किंग स्टाफ यांचा समावेश आहे.
यावेळी पंतप्रधानांनी स्टार्टअप ते स्वयंरोजगार योजनेचाही उल्लेख केला. स्किल इंडिया अभियानांतर्गत तरुणांना प्रशिक्षण मिळत असल्याची माहितीही देण्यात आली. ते म्हणाले, ‘देशात गेल्या आठ वर्षांत जी रोजगार आणि स्वयंरोजगाराची मोहीम सुरू आहे, त्यात आज आणखी एक दुवा जोडला जात आहे. रोजगार मेळाव्याची ही लिंक आहे.
या माध्यमातून केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व विभागातील रिक्त पदे भरली जातील, असे पंतप्रधान म्हणाले. यातून 10 लाख तरुणांना रोजगार मिळणार आहे.
पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत 10 लाख रिक्त पदांची भरती होणार आहे. यासाठी शासनाने रोजगार मेळावे घेण्याचे ठरवले आहे. रोजगार मेळाव्याचे अधिकृत संकेतस्थळ लवकरच प्रसिद्ध केले जाईल. केंद्र सरकारने जारी केलेल्या माहितीनुसार, या 10 लाख भरती यूपीएससी, एसएससी आणि आरआरबीच्या माध्यमातून केल्या जातील. अनेक मंत्रालये आणि विभाग स्वतःची भरती देखील करतील.
कोणत्या विभागात किती पदे रिक्त
| रेलवे | 2,93,943 |
| डिफेंस (सिविलियन) | 2,64,706 |
| गृह मंत्रालय | 1,43,536 |
| डाक | 90,050 |
| रेवेन्यू | 80,243 |
| इंडियन ऑडिट एंड अकाउंट | 25,934 |
| खनन | 7,063 |
| एटॉमिक एनर्जी | 9,460 |
| वॉटर रिसोर्स, रिवर डेवलपमेंट एंड गंगा | 6,860 |
| कल्चर | 3,788 |
| अर्थ साइंस | 3,043 |
| हाउसिंग एंड अर्बन अफेयर्स | 2,751 |
| पर्सनल, पब्लिक, ग्रीवांसेज एंड पेंशन | 2,535 |
| लेबर एंड इम्प्लॉयमेंट | 2,408 |
| पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन | 2,302 |
| स्टेटिक्स एंड प्रोग्राम इंप्लीमेंटेशन | 2,156 |
| स्पेस | 2,106 |
| इंफॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग | 2,041 |
| स्वास्थ्य और परिवार कल्याण विभाग | 1,769 |
| इलेक्ट्रॉनिक्स एंड इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी | 1,568 |
| पोर्ट, शिपिंग एंड वॉटरवेज | 1,043 |
| अन्य | 30,022 |
| कुल | 9,79,327 |
कोणत्या ग्रेडमध्ये किती जागा रिक्त
| ग्रेड | रिक्त पदे |
| ग्रेड ए | 23,584 |
| ग्रेड बी | 26,282 |
| ग्रेड सी (गजटेड) | 92,525 |
| ग्रेड सी (नॉन गजेट) | 8,36,936 |
(आकडे: मार्च २०२२ पर्यंतचे आहेत)
सोर्स : आकडेवारी विविध माध्यमे व सोशल मीडियातून घेतली आहे.









































































