Last Updated on 25 Nov 2023 5:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अधोरेखित ऑनलाइन डेस्क । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फायटेर प्लेन ‘तेजस’मधून भरारी घेतल्यानंतर आज सोशल मीडियावर फोटो शेअर केले. त्यात त्यांनी म्हटले आहे की,तेजसवर यशस्वीरित्या प्रदक्षिणा पूर्ण केली. हा अनुभव आश्चर्यकारकपणे समृद्ध करणारा होता, आपल्या देशाच्या स्वदेशी क्षमतांवरील माझा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढवणारा होता आणि मला आपल्या राष्ट्रीय क्षमतेबद्दल अभिमान आणि आशावादाची नवीन भावना देऊन गेली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सरकारी मालकीच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला भेट दिली. यादरम्यान त्यांनी बंगळुरूमध्ये तेजस फायटर प्लेनमधून उड्डाण केले. पंतप्रधान मोदींनी आज या कंपनीचा आढावाही घेतला.हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ला भेट देण्यासाठी पंतप्रधान मोदी शनिवारी बंगळुरूमध्ये दाखल झाले होते.एचएएलला भेट देताना पंतप्रधान मोदींनी उत्पादन सुविधेचा आढावा घेतला. भारतीय हवाई दलाने अलीकडेच सरकारी मालकीच्या HAL ला 12 प्रगत Su-30MKI लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी निविदा जारी केली होती.
कर्नाटकमधील बंगळूर येथील येलहंका एयरबेसमधून त्यांनी तेजसमधून भरारी घेतली.तेजस विमानाची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) केली आहे. तेजस हे सिंगल इंजिन असणार विमान असून ‘मेक इन इंडिया’ फायटर जेट आहे. तेजस विमानाचे दोन स्क्वॉड्रन भारतीय हवाई दलात दाखल झाल्या आहेत.तेजस हे स्वदेशी हलके लढाऊ विमान आहे जे कोणत्याही हवामानात उडू शकते. हे दोन पायलट असलेले लढाऊ विमान आहे. याला ग्राउंड अटॅक एअरक्राफ्ट असेही म्हणतात.पंतप्रधान मोदी संरक्षण उत्पादनांच्या स्वदेशी उत्पादनावर भर देत आहेत. सरकारने भारतात याच्या उत्पादनाला आणि त्यांच्या निर्यातीला कशा प्रकारे प्रोत्साहन दिले आहे यावर प्रकाश टाकला आहे.
पंतप्रधानांनी X वर त्यांचा अनुभव शेअर केला:
“तेजसमधून यशस्वीरित्या उड्डाण केले. हा अनुभव अतिशय समृद्ध करणारा होता, आपल्या स्वदेशी क्षमतांवरील माझा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढवणारा होता आणि आपल्या राष्ट्रीय क्षमतेबद्दल अभिमान आणि आशावादाची नवीन भावना मला देऊन गेला.” असे पंप्रधान म्हणाले.
“मी आज तेजसमधून उड्डाण करताना अतिशय अभिमानाने सांगू शकतो की आपली मेहनत आणि दृढ निर्धार यामुळे आपण स्वयंपूर्णतेच्या बाबतीत जगातील कोणाहीपेक्षा कमी नाही. भारतीय हवाई दल, डीआरडीओ आणि एचएएल यांच्याबरोबरच समस्त देशवासियांचे हार्दिक अभिनंदन.”









































































